मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झारगडवाडीत संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप..

झारगडवाडीत संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.. बारामती लोकसभेच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त शनिवारी ( दि. १ ) बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व १९२ विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल साहित्य वाटप करण्यात आले. हे वाटप झारगडवाडी ग्रामपंचायतचे सदस्य अजित बोरकर यांच्या वतीने देण्यात आले. या साहित्याचे वाटप, छत्रपती साखर कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बोरकर, उपसरपंच रामभाऊ करे, माजी सरपंच नितीन शेडगे, माजी सरपंच संतोष मासाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहूल बिचकुले, सुरेश बोरकर, मुख्याध्यापक हनुमंत जाधव धोंडीबा लाटे, शिक्षक अशोक लडकत, सुनीता गुरव, सुवर्णा नाळे, संगीता भोसले, आशा लडकत, शैलजा वाडते आदी मान्यवर उपस्थित होते. पुष्पगुच्छ, भेटवस्तूऐवजी गरजू मुलांना आवश्यक साहित्य वाटप करावे असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शुभंचिंतकांना केले होते त्यानुसार आपली समाजाप्रतीची असलेली...

झारगडवाडी येथील राणाप्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पडली पार..

झारगडवाडी येथील राणाप्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पडली पार.. राणाप्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था झारगडवाडी या संस्थेचे सन 2022- 23 या आर्थिक वर्षाची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष व बारामती तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक नानासाहेब झारगड यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतीच पार पडली. या सर्वसाधारण सभेमध्ये या संस्थेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करण्यात आला. आर्थिक वर्षामध्ये संस्थेकडे 964 सभासद असून संस्थेचे भाग भांडवल 91 लाखाच्या पुढे असून संस्थेकडे 8 कोटी 43 लाख रुपयांच्या ठेवी आहेत संस्थेने आतापर्यंत जवळपास सात कोटी 91 लाख रुपया पर्यंत कर्ज वाटप केले आहे. संस्थेला साधारण 11 लाख 92 हजार 794 रुपये एवढा नफा झालेला आहे. संस्थेचा एन.पी. ए. 4.91% असून संस्थेला ऑडिट वर्ग अ चा दर्जा मिळालेला आहे.  या सर्वसाधारण सभेला बारामती तालुका पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन तानाजी कर्चे, लेखापाल अधिकारी किरण चौधरी, सहकार शिक्षण अधिकारी संजय नेवसे, पी डी सी बँकेचे कर्मचारी संजय निकम, झारगडवाडी गावचे माजी सरपंच नितीन शेडगे, राणाप्रताप पतस...

राज्य सुजलाम सुफलाम व्हावे विठ्ठलाकडे हर्षवर्धन पाटील यांचे साकडे

राज्य सुजलाम सुफलाम व्हावे - हर्षवर्धन पाटील यांचे विठ्ठलाकडे साकडे  राज्यात अजूनही समाधानकारक असा पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र समाधानकारक पाऊस होऊन, राज्य सुजलाम सुफलाम व्हावे व शेतकरी सुखी रहावा, असे साकडे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी आज गुरुवारी (दि.29) घातले. आषाढी एकादशी निमित्त हर्षवर्धन पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. हर्षवर्धन पाटील हे गेली 35 वर्ष न चुकता आषाढी एकादशीला पंढरीची वारी करीत आहेत. नुकताच राज्यात काही भागात पाऊस सुरू झाला आहे, मात्र अनेक भागात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे चांगला पाऊस होऊन सर्वत्र सुख, शांती, समाधान निर्माण होऊ दे, अशी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना केली. आमचे घराण्याला वारकरी संप्रदायाची परंपरा असून, सदरची परंपरा आम्ही पुढे चालवीत आहोत असे नमूद करून त्यांनी सांगितले की, पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील अद्वितीय असा उत्सव आहे. विठ्ठल हे साऱ्या विश्वाचे दैवत आहे.

अनंत विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सखाराम मासाळ

अनंत विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सखाराम मासाळ   बारामती : बारामती तालुक्यातील अनंत विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सखाराम मासाळ, तर उपाध्यक्षपदी महादेव भोंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष राहुल साळुंके, तर महादेव भोंग यांनी उपाध्यपदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. यामुळे या जागेवर निवडणूक लागलेली होती.  बारामती प्रशासकीय भवन येथील सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी अमर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.  यावेळी संस्थापक सदस्य दयाराम महाडीक, मावळते अध्यक्ष राहुल साळुंके, उपाध्यक्ष महादेव भोंग, धनंजय निकम, विजयकुमार निकम, अभिजीत महाडिक, राजेंद्र साळुंके, महादेव जाधव, ऋतुराज जाचक, सौ. शुभांगी महाडिक, श्रीमती अनिता निकम, सचिव मधुकर निकम, सहसचिव अविनाश निकम आदी मान्यवर उपस्थित होते. दयाराम महाडिक - कुठलाही खंड न पडता जरवर्षी प्रमाणे सभासदांना लाभांश वाटप केला जातो यावर्षी देखील जास्तीचा लाभांश कसा देता येईल याकडे संचालक मंडळाचे नियोजन असणार आहे. सध्या सोसायटीचा शंभर टक्...

दौंड मधील डॉक्टरने पत्नीचा गळा दाबून आणि दोन मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही संपवले जीवन..

दौंड तालुका हादरून गेला आहे; डॉक्टरने पत्नी, दोन मुलांसह केली आत्महत्या, मुलांचे मृतदेह आढळले विहिरीत.. दौंड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. वरवंड येथील डॉक्टर ने  आपल्या पत्नीचा अगोदर गळा दाबून खून केला आणि आपल्या चिमुकल्या दोन निरागस मुलांना घरा शेजारी असलेल्या विहिरीत ढकलून देत स्वतः घरी येत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे.. कौटुंबिक वादाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. वरवंड येथील गंगासागर पार्कमध्ये राहत्या घरी ही घटना समोर आली आहे... डॉ.अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२ ) आणि पत्नी पल्लवी (वय ३५) यांचे मृतदेह यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरी सापडले असून मुलगा अद्वित अतुल दिवेकर (वय ११ ) आणि मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (वय ७ ) यांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत. विहीर जवळपास १० परस इतकी खोल असून ४५ फूट एवढे पाणी असल्याने मुलांना वर काढण्यात मोठी अडचण येत असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे...  डॉ. अतुल दिवेकर हे व्यवसायाने ज...

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या येत्या रविवारी बारामतीत

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या येत्या रविवारी बारामतीत;   MTV MARATHI NEWS शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेही राहणार उपस्थित..  बारामतीत अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्यानिमित्त राहणार उपस्थित.. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी केले आहे जयंतीचे आयोजन.. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे येत्या रविवारी २५ जून रोजी बारामतीत येत आहेत.. अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे आयोजित अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे..  रविवारी बारामतीत होणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकाधिक नागरिकांनी व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वासराव देवकाते यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, मदनराव देवकाते,  सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य बाळासाहेब बंडगर...

इंदापूर मधील रस्त्यांच्या कामांची चौकशी होणार.. गजानन वाकसे

इंदापूर मधील रस्त्याच्या कामाची होणार चौकशी.. गजानन वाकसे MTV MARATHI NEWS.. इंदापूर मधील रस्त्यांच्या कामांची चौकशी होणार असल्यामुळे आमदारांची मनस्थिती ढासळली आहे त्यामुळे ते बेताल वक्तव्ये करू लागले आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्रचे सरचिटणीस गजानन वाकसे यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यावर केला आहे.. इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्यांच्या कामांमध्ये शेकडो कोटी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराची तसेच दर्जाहीन कामांची चौकशी होणार असल्यामुळे, आपले बिंग फुटेल या भीतीमुळे आमदारांची मनस्थिती ढसाळल्याचे रविवारी तालुक्यातील एका कार्यक्रमांमध्ये दिसून आले. पायाखालची वाळू सरकू लागलेल्या आमदार बेताल वक्तव्ये करीत आहेत त्यांनी त्वरित बेताल वक्तव्य थांबावीत अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्रचे सरचिटणीस गजानन वाकसे यांनी दिला. राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सणसरला  पालखी पाहणी दौऱ्यावरती आले असता अनेक पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ यांनी इंदापूर तालुक्यात रस्त्यांच्या झालेल्या निष्कृष...

झारगडवाडीच्या सुप्रिया निकम हिची तालुका कृषी अधिकारी पदी निवड..

झारगडवाडीच्या सुप्रिया निकम हिची तालुका कृषी अधिकारी पदी निवड..  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून झाली निवड.. उत्तुंग यश संपादन केल्याने सुप्रियावर अभिनंदन चा होतोय वर्षाव.. बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावची सुप्रिया तानाजी निकम हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा सन 2021 मधून पहिल्याच प्रयत्नात तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तिने मिळवलेल्या यशाने तिचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. रविवारी ( ता. 11 ) झारगडवाडी गावामध्ये गावकऱ्यांच्या वतीने तिची मिरवणूक काढण्यात आली. गावातील अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ तिचा सत्कार कार्यक्रम घेत भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दयाराम महाडिक, बारामती दूध संघाचे विद्यमान संचालक श्रीपती जाधव, छत्रपती कारखान्याचे माझी एमडी अशोक मोरे, रमेश मोरे, अशोक नवले,  सौ मंदाकिनी निकम, बारामती नगरपालिकेच...

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी निवडी ओळखून पुढील शैक्षणिक निर्णय घ्यावेत - हर्षवर्धन पाटील

विद्यार्थ्यांनी आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखून शैक्षणिक प्रवेशाचे निर्णय घ्यावेत - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा,आणि १००% निकाल लागलेल्या शाळांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठाण, वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर व श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी, बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 11 जून रोजी येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा,आणि १००% निकाल लागलेल्या शाळांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखून शैक्षणिक प्रवेशाचे निर्णय घ्यावेत असे मत व्यक्त केले. हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' 10वी व 12 वी नंतर पुढे कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा याचा निर्णय विद्यार्थ्यांनी आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे...

पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी बस आणि पिकअप मध्ये अपघात..

पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी बस आणि पिकअप मध्ये अपघात.. बारामती : पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर मार्गावर भोरवाडीफाटा येथे एसटी बस आणि पिकअप टेम्पो यांचा भीषण अपघात झालाय. पंढरपूरहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि पुणे बाजूकडून वाल्हेकडे  निघालेल्या पिकअप टेम्पो यांची जोरदार धडक झाली. एसटीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये एसटीतील 13 ते 14 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका प्रवाशांच्या पायाचे हाड मोडले असून एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अशी माहिती समोर आली आहे. जखमींना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर जेजुरी पोलीस आणि स्थानिकांनी मदत करून जखमींना बाहेर काढलय. यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान..

टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान.. पुणे : 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.  देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आदी पूजेला उपस्थित होते.  पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते. महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले. 

शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलीच !

शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलीच ! सुप्रिया सुळे यांच्यासोबत 'या' नेत्याला बनवलं कार्यकारी अध्यक्ष.. सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल नवे कार्यकारी अध्यक्ष.. शरद पवार यांची दिल्लीत मोठी घोषणा.. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यातील निवडणुकांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे.. अजित पवार यांच्याकडे कुठलीही जबाबदारी नाही.. अजित पवार नाराज असल्याची चर्चा.. बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबाबत अखेर भाकरी फिरवली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे पक्षातील पवारांचे उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेंसोबत प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित झालं आहे.  राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या आधीपासूनच प्रफुल पटेल शरद पवारांच्या सोबत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाबाहेरील राष्ट्रवादीचा सर्वोच्च नेता म्हणूनही पटेल यांना ओळखलं जातं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकारी...

बारामती, दौंड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर

बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर.. खासदार सुप्रिया सुळे  बारामती : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली.  या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी  २ कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. त्यासाठी  ३ कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाले आहेत... याबरोबरच दौंड तालुक्यातील रावणगाव येथेप्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी २२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमा...

बारामतीत जुनी वखार आगीत जळून खाक..

बारामतीत जुनी वखार आगीत जळून खाक.. आगीत लाकूड, बनवलेले दरवाजे, खिडक्या आणि इतर साहित्य जळून खाक यात अंदाजे 70 लाखाचे नुकसान.. बारामती कसबा परिसरातील साठे नगर या ठिकाणी 65 वर्षाच्या जुन्या वखारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली आगीचे लोट मोठ्या प्रमाणामध्ये उसळलेले होते.. यामध्ये शेजारी असलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचाना देखील तडे गेले आहेत आग लागल्याची माहिती वखार मालक आणि स्थानिकांनी बारामती नगरपालिकेच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिली मात्र गाडी त्या ठिकाणी उशिरा पोहोचली यामुळे आग नियंत्रणात आली नाही असे वखार मालक व स्थानिकांनी सांगितले.. एमआयडीसी अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग नियंत्रणात आली.. मात्र वखारीत असलेले लाकूड, बनवून ठेवलेले दरवाजे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे..   भारत रतनसिंग पटेल ( रा. कसबा साठेनगर बारामती ) असे वखार मालकाचे नांव आहे.. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे या आगीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यता जवळपास 70 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे वखार मालकाने सांगितले आहे.. नगरपालिकेची अग्निशमन ...

"पत्रकार संघ बारामती" संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.विजय भिसे, तर उपाध्यक्ष पदी नवनाथ बोरकर, शिवाजीराव ताटे यांची बिनविरोध निवड..

  "पत्रकार संघ बारामती" संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.विजय भिसे, तर उपाध्यक्ष पदी नवनाथ बोरकर, शिवाजीराव ताटे यांची बिनविरोध निवड.. बारामती :  बारामती तालुक्यातील "पत्रकार संघ बारामती" या संघाची तीन वर्षासाठी कार्यकारिणी निवड आज ( शुक्रवारी ता. 2 ) करण्यात आली. यात अध्यक्ष पदी डाॅ.विजय भिसे, उपाध्यक्ष पदी नवनाथ बोरकर, शिवाजीराव ताटे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली..   पुढील तीन वर्षासाठी झालेली कार्यकारिणी - कार्याध्यक्ष शुभांगी महाडिक, सचिव तैनुर शेख, सह सचिव स्वप्निल शिंदे, खजिनदार सोमनाथ कवडे, सहखजिनदार दीपक पडकर या सर्वांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली..  यावेळी मावळते अध्यक्ष सुधीर जन्नू, जेष्ठ पत्रकार दत्ता महाडिक, अमोल तोरणे, वसंत मोरे, राजेश वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते.