झारगडवाडी ग्रामपंचायतला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी.. "आओ जाओ घर तुम्हारा" वागणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा.. पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी न दिल्यास १८ डिसेंबर पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार.. सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे.. झारगडवाडी : झारगडवाडी ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत आहे, या गावाला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र या गावाला बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याकडून पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी दिला जात नाही यामुळे गावचा विकास थांबला आहे. झारगडवाडी गावाला पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी तात्काळ द्यावा अन्यथा १८ डिसेंबर पासून बारामती पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी सांगितले आहे. यासाठी बारामतीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र व्यवहार देखील करण्यात आला आहे. झारगडवाडी गावाला सध्या मेखळी गावातील असलेले ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांच्याकडे झारगडवाडी चा अतिरिक्त चार्ज देण्यात आला आहे. मात्र हे महाशय "...
News, Intertentenment, Information