बारामती - थंडीचा जोर वाढल्याने झारगडवाडी येथील शेतकऱ्यांच्या दीड महिन्यापूर्वी वेलेल्या गाईचा मृत्यू..
थंडीचा जोर वाढल्याने झारगडवाडी येथील शेतकऱ्यांच्या दीड महिन्यापूर्वी वेलेल्या गाईचा मृत्यू.. बारामती - बारामती तालुक्यात थंडीचा जोर जास्त वाढल्याने माणसाप्रमाणे जनावरांना देखील थंडीची झळ सोसावी लागत आहे. झारगडवाडी येथील शेतकरी गोपीनाथ धनाजी बोरकर यांची दीड महिन्यापूर्वी वेलेली चाळीस हजाराची गाई हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मरण पावली. थंडीचा जोर जास्त असल्याने नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी गाई गोट्यात बांधली होती गाईच्या मालकाने सायंकाळी नऊ वाजता गाईला चारा टाकला होता त्यानंतर साडे अकरा वाजताच्या सुमारास गाई ओरडल्याचा आवाज आल्याने गाई मालक बाहेर आला त्यावेळी गोट्यात पाहिले असता गाईने अंग टाकून दिल्याचे पाहिले मिळाले. गाईला उटवण्याचा प्रयत्न केला परंतु गाई उटली नाही गाईने प्राण सोडला होता. वीस लिटर दूध देणारी तिसऱ्या वेताची गाई होती दीड महिन्यापूर्वी गाई वेलेली होती गाय मरण पावल्याने शेतकऱ्याचे यात अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे आता या गाईचा बारामती महसूल विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पंचनामा व शवविच्छेदन व्होऊन तातडीने नुकसान भरपाई म...