दौंड तालुका हादरून गेला आहे; डॉक्टरने पत्नी, दोन मुलांसह केली आत्महत्या, मुलांचे मृतदेह आढळले विहिरीत..
दौंड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. वरवंड येथील डॉक्टर ने आपल्या पत्नीचा अगोदर गळा दाबून खून केला आणि आपल्या चिमुकल्या दोन निरागस मुलांना घरा शेजारी असलेल्या विहिरीत ढकलून देत स्वतः घरी येत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे.. कौटुंबिक वादाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. वरवंड येथील गंगासागर पार्कमध्ये राहत्या घरी ही घटना समोर आली आहे...
डॉ.अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२ ) आणि पत्नी पल्लवी (वय ३५) यांचे मृतदेह यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरी सापडले असून मुलगा अद्वित अतुल दिवेकर (वय ११ ) आणि मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (वय ७ ) यांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत. विहीर जवळपास १० परस इतकी खोल असून ४५ फूट एवढे पाणी असल्याने मुलांना वर काढण्यात मोठी अडचण येत असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे...
डॉ. अतुल दिवेकर हे व्यवसायाने जनावरांचे डॉक्टर असून त्यांची पत्नी ही एका शाळेत शिक्षिका असल्याची माहिती समोर आली आहे.. पोलिसांना घटना स्थळावरून एक सूसाईड नोट मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे या धक्कादायक घटनेचा अधिक तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा