मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खामगळवाडी सोसायटीच्या चेअरमन पदी विठ्ठल गणपतराव खामगळ यांची बिनविरोध निवड..

खामगळवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी विठ्ठल गणपतराव खामगळ यांची बिनविरोध निवड.. बारामती : खामगळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी  संस्था ही 1959 साली स्थापन झाली असून, वडीलधाऱ्यानी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेची निवडणूक लागू नये म्हणून गावातील पदाधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले होते.. चेअरमन पदाची निवडणूक देखील बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले आहे. चेअरमन पदासाठी साधक बाधक चर्चा करून निवडणुक न लावता एकमताने चेअरमन पद निवडण्यात आले. बारामती प्रशासकीय भवनात असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयात चेअरमनपदासाठी विठ्ठल खामगळ यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक अमर गायकवाड यांनी खामगळ यांची चेअरमन पदी निवड झाल्याचे जाहीर केले.. निवडणुकीचे काम सहाय्य्क निबंधक अधिकारी अमर गायकवाड आणि सोसायटीचे सचिव संजय जगदाळे यांनी पाहिले.यावेळी धनंजय खामगळ,अशोक खामगळ, मल्हार खामगळ,रमेश खामगळ, दादा खामगळ, मोहन खामगळ, शिवाजी खामगळ, रवींद्र खामगळ आदी मान्यवर उपस्थितीत होते. संस्थेची स्थापना 1959 साली स्थापना झाली आहे भविष्या...

बारामतीत आजपासून एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय होणार सुरू..

बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर च्या उद्योजकांना खुशखबर; बारामतीत आजपासून एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय होणार सुरू.. बारामती  : आता इतर तालुक्यातील उद्योजकांना पुणे व मुंबई या ठिकाणी जावे लागण्याची गरज बासणार नाही. कारण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय आता बारामतीत होणार आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, पुरंदर व इंदापूर या तालुक्यातील कार्यरत आणि प्रस्तावित असलेल्या उद्योगांशी संबंधित भूसंपादनाची कामे व इतर कामे या कार्यालयातून होणार आहेत. आज सोमवारी ( ता. 9 ) या कार्यालयाची बारामतीत सुरुवात होणार आहे. सकाळी 11 वाजता बारामतीतील प्रादेशिक कार्यालय सुरू होणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सांभाळणार आहेत.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे बारामती एमआयडीसी मध्ये हे प्रादेशिक कार्यालय कार्यान्वित होत आहे. या संदर्भातील आदेश एमआयडीसीचे महाव्यवस्थापक तुषार मटकर यांनी दिला आहे.राज्य सरकारने नव्याने राज्यातील सात ठिकाणी प्रादेशिक कार्यालय कार्यान्वित करण्यासाठी नि...

झारगडवाडी ग्रामपंचायतचे तत्कालीन उपसरपंच,विद्यमान सदस्या यांना पुणे जिल्हाधिकारी यांनी ठरवले अपात्र

झारगडवाडी ग्रामपंचायतच्या तत्कालीन उपसरपंच, विद्यमान सदस्या यांना पुणे जिल्हाधिकारी यांनी ठरवले अपात्र.. जात वैधता प्रमाणपत्राची दिरंगाई करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्र...  निवडणुकीनंतर दोन वर्षे आठ महिने होऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पुणे जिल्हाधिकारी अपात्रतेचा दिला आदेश.... बारामती : शासनाने सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात निर्देशित केलेल्या जात वैधता प्रमाणपत्र नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झारगडवाडी ता. बारामती येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सोनाली रामभाऊ करे यांना पुणे जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवत त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे यामुळे निवडणूकीनंतर कागदपत्राची दिरंगाई करणाऱ्यांना चांगली चपराक मिळाली आहे. कोविड-१९ जागतिक महामारीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या होत्या. परंतु महामारीच्या काळात प्रशासनातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करत या निवडणुका २०२० च्या अखेरीस पार पडल्या. जानेवारी २०२१ पासून राज्यात कार्यरत असलेल्या जवळपास १४,००० ग्रामपंचायत कार्यकारणीतील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्य...

डोर्लेवाडीत (बारामती ) सहेली फाउंडेशन पार्थदादा दहीहंडी वहिनी साहेब चषकाचा मानकरी ठरला जय मल्हार दहीहंडी संघ..

डोर्लेवाडीत सहेली फाउंडेशन पार्थदादा दहीहंडी वहिनी साहेब चषकाचा मानकरी ठरला जय मल्हार दहीहंडी संघ..   राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार करताना सहेली फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी खडसे आटोळे व सहकारी महिला  बारामती : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात शनिवार (दि.३१) ऑगस्ट रोजी सहेली फाउंडेशन च्या अध्यक्षा रोहिणी खरसे आटोळे व सहकारी महिलांच्या वतीने पार्थदादा दहीहंडी उत्सव २०२४ वहिनी साहेब चषक चे आयोजन करण्यात आले होते. गुणवडी येथील जय मल्हार दहीहंडी संघाने ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला आहे. याप्रसंगी राज्यसभेचा खासदार सुनेत्रा पवार, सिने अभिनेत्री मुग्धा कर्णिक, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले, सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील भगत,पिंपळीच्या सरपंच स्वाती ढवाण, डोर्लेवाडीच्या सरपंच सुप्रिया नाळे, उपसरपंच विश्वजीत घोडे, अविनाश काळकुटे, शैलेश बाबा जाधव,दिलीप चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते... कोट : महिलांनी आयोजित केलेली बारामती मधील पहिली दहीहंडी असून रस्त्यावरील दहीहंडी मैदानात आण...