धनगर आरक्षणाचे लोन आता ग्रामीण भागात.. झारगडवाडी येथे धनगर बांधवांनी बारामती वालचंदनगर रोडवर मेंढर आणून केले अनोखे आंदोलन.. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा.. ठिकठिकाणी रास्ता रोको.. झारगडवाडी : धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बारामती येथे धनगर बांधव चंद्रकांत वाघमोडे हे गेली नऊ दिवस आमरण उपोषण बसले आहेत.. या उपोषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आज सकाळपासूनच ग्रामीण भागातील गावोगावी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.. ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला तर झारगडवाडी येथे आज धनगर बांधवांनी बारामती वालचंदनगर रोडवर मेंढर रस्त्यावर आणून अनोख्या पद्धतीने रास्ता रोको करण्यात आला. झारगडवाडी येथे काल "भुतो ना, भविष्य" असा कॅण्डल मार्च काढण्यात आला यात महिलांची आणि युवकांची लक्षणीय संख्या होती आणि आज बारामती धनगर आरक्षणासाठी बसलेले उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्या सूचनेनुसार गाव बंद ठेवून रस्त्यावर मेंढर आणून बारामती वालचंदनगर रस्ता अर्धा तास अडवून रास्ता रोको देखील करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने वाहन...
News, Intertentenment, Information