बारामतीत जुनी वखार आगीत जळून खाक..
आगीत लाकूड, बनवलेले दरवाजे, खिडक्या आणि इतर साहित्य जळून खाक यात अंदाजे 70 लाखाचे नुकसान..
बारामती कसबा परिसरातील साठे नगर या ठिकाणी 65 वर्षाच्या जुन्या वखारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली आगीचे लोट मोठ्या प्रमाणामध्ये उसळलेले होते.. यामध्ये शेजारी असलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचाना देखील तडे गेले आहेत आग लागल्याची माहिती वखार मालक आणि स्थानिकांनी बारामती नगरपालिकेच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिली मात्र गाडी त्या ठिकाणी उशिरा पोहोचली यामुळे आग नियंत्रणात आली नाही असे वखार मालक व स्थानिकांनी सांगितले.. एमआयडीसी अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग नियंत्रणात आली.. मात्र वखारीत असलेले लाकूड, बनवून ठेवलेले दरवाजे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे..
भारत रतनसिंग पटेल ( रा. कसबा साठेनगर बारामती ) असे वखार मालकाचे नांव आहे.. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे या आगीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यता जवळपास 70 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे वखार मालकाने सांगितले आहे.. नगरपालिकेची अग्निशमन गाडी वेळेत न पोचल्यामुळेच ही आग नियंत्रणात आली नाही असा आरोप वखारीच्या मालकाने केला आहे.. आग विझवण्यासाठी एमआयडीसी अग्निशमन दल, साठे नगर मधील तरुणांनी आपला जीव मुठीत धरून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले त्यांचे आभार देखील वखार मालकाने मानले..
बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून बारामती नगरपालिकेला अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.. बारामती शहरात कुठेही आग लागली तर वेळेत त्या ठिकाणी जाऊन आग विझवणे हे अग्निशमन यंत्रणेचे काम आहे मात्र आज लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन ची गाडी वेळेत पोहोचली नाही यात बारामतीच्या नगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.. यामुळे बारामतीत असलेल्या अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेचा उपयोग काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा