झारगडवाडीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर पडले पार.. 22 जुलै 2023.. झारगडवाडीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर पडले पार.. झारगडवाडीचे युवा सरपंच अजित बोरकर यांच्या पुढाकारातून गोरगरिबांसाठी समाज उपयोगी आरोग्य शिबिर.. झारगडवाडी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 64 व्या वाढदिवसा निमित्त शनिवारी ( ता. २२ ) प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी ( बारामती ) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन झारगडवाडी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराला झारगडवाडी व परिसरातील ग्रामस्थांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये अस्थिरोग ( हाडाची ) तपासणी, दातांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच जनरल मेडिसिन व हृदयरोग तपासणी करण्यात आली. यात शेकडो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूराव दडस आणि त्यांच्या सर्व कर्मचारी स्टाप ने मोलाचे सहकार्य केले. यावेळी छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दयाराम महाडिक, मा...
News, Intertentenment, Information