मुख्य सामग्रीवर वगळा

झारगडवाडी येथील राणाप्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पडली पार..

झारगडवाडी येथील राणाप्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पडली पार..



राणाप्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था झारगडवाडी या संस्थेचे सन 2022- 23 या आर्थिक वर्षाची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष व बारामती तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक नानासाहेब झारगड यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतीच पार पडली. या सर्वसाधारण सभेमध्ये या संस्थेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करण्यात आला.

आर्थिक वर्षामध्ये संस्थेकडे 964 सभासद असून संस्थेचे भाग भांडवल 91 लाखाच्या पुढे असून संस्थेकडे 8 कोटी 43 लाख रुपयांच्या ठेवी आहेत संस्थेने आतापर्यंत जवळपास सात कोटी 91 लाख रुपया पर्यंत कर्ज वाटप केले आहे. संस्थेला साधारण 11 लाख 92 हजार 794 रुपये एवढा नफा झालेला आहे. संस्थेचा एन.पी. ए. 4.91% असून संस्थेला ऑडिट वर्ग अ चा दर्जा मिळालेला आहे.  या सर्वसाधारण सभेला बारामती तालुका पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन तानाजी कर्चे, लेखापाल अधिकारी किरण चौधरी, सहकार शिक्षण अधिकारी संजय नेवसे, पी डी सी बँकेचे कर्मचारी संजय निकम, झारगडवाडी गावचे माजी सरपंच नितीन शेडगे, राणाप्रताप पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हनुमंत देवकाते, सचिव दिलीप झारगड, व्यवस्थापक हनुमंत शिंदे, संदीप दळवी, शिपाई राजेंद्र आवटे सभासद वर्ग आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन अनिल रुपनवर सर यांनी केले तर आभार राणाप्रताप पतसंस्थेचे संचालक रणजीत देवकाते यांनी मानले.


नानासाहेब झारगड (चेअरमन राणाप्रताप पतसंस्था) - 
राणाप्रताप पतसंस्थेच्या माध्यमातून झारगडवाडी आणि परिसरातील अनेक भागांमध्ये विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवले जातात. झारगडवाडी व परिसरातील  दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला जातो. झारगडवाडी, डोर्लेवाडी गावातून जाणाऱ्या संतराज महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पाणीबोटल दूध बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो यावर्षी देखील तो झारगडवाडी गावात घेण्यात आला होता असे पतसंस्थेचे चेअरमन नानासाहेब झारगड यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.