मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न.. बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबीरात 50 रक्त पिशव्याचे संकलन झाले आहे. यावेळी 100 महिलांना रक्तवाढीच्या मोफत गोळ्या व औषधांचे, दिव्यांग रुग्णांना 44 वॉकर आणि वृध्द व दिव्याग रुग्णांना 15 व्हील चेअर वाटप करण्यात आले. सदरच्या गोळ्या व औषधे, वॉकर आणि व्हील चेअर विविध क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्राप्त झाले होते. यावेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेचे मुख्य प्रबंधक आदिल्य गोगटे, उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव, प्राध्यापिका डॉ. अंजली शेटे,सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरज जाधवर, सहाय्यक प्राध्यापक डॉ.सौरभ मुथा, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, समाजसेवा अधिक्षक बालाजी चांडोळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.. मुंबई : - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' या समाज माध्यमावर पोस्ट करत अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. 'महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विचारधारा अधिक बळकट करण्यामध्ये श्री.पवार हे मोलाचे योगदान देत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.' अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही 'एक्स' या समाज माध्यमावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट...

झारगडवाडीतील स्मशानभूमीत कृषीकन्यांकडून वृक्षारोपणाचा कौतुकास्पद उपक्रम..

झारगडवाडीच्या स्मशानभूमीत शारदानगर ( बारामती ) येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांकडून वृक्षारोपण.. फोटो : झारगडवाडी ( बारामती ) येथील स्मशान भूमीत वृक्ष लागवड करताना झारगडवाडी चे सरपंच व कृषिकन्या.. बारामती : शारदानगर (बारामती ) येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील कृषि विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत झारगडवाडीत स्मशानभूमी परिसरात कृषीदिनानिमित्त वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. झारगडवाडीतील स्मशानभूमी परिसरात पिंपळ, वड, गुलमोहर अशा देशी झाडांच्या वाणाचे वृक्षारोपण करून विविध छायादार व सदाबहार झाडांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी गावचे सरपंच अजित बोरकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बोरकर, क्लार्क अनिल माने, तसेच गावातील ग्रामस्थ कृषीकन्या गायत्री शर्मा, गौरी गाढवे, नम्रता पाटील, समृद्धी घाडगे, अलसना सय्यद, विजयालक्ष्मी रुद्रमठ, साक्षी उकिरडे यानी त्यात सहभाग दर्शवला. कोट : अजित बोरकर झारगडवाडी सरपंच म्हणाले, “स्मशानभूमी सारख्या ठिकाणी वृक्षलागवड केल्याने त्या ठिकाणी शांतता, सावली आणि स्वच्छता यांची वाढ होई...