मुख्य सामग्रीवर वगळा

झारगडवाडीच्या सुप्रिया निकम हिची तालुका कृषी अधिकारी पदी निवड..

झारगडवाडीच्या सुप्रिया निकम हिची तालुका कृषी अधिकारी पदी निवड.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून झाली निवड..

उत्तुंग यश संपादन केल्याने सुप्रियावर अभिनंदन चा होतोय वर्षाव..



बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावची सुप्रिया तानाजी निकम हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा सन 2021 मधून पहिल्याच प्रयत्नात तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तिने मिळवलेल्या यशाने तिचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. रविवारी ( ता. 11 ) झारगडवाडी गावामध्ये गावकऱ्यांच्या वतीने तिची मिरवणूक काढण्यात आली. गावातील अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ तिचा सत्कार कार्यक्रम घेत भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दयाराम महाडिक, बारामती दूध संघाचे विद्यमान संचालक श्रीपती जाधव, छत्रपती कारखान्याचे माझी एमडी अशोक मोरे, रमेश मोरे, अशोक नवले, सौ मंदाकिनी निकम, बारामती नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा ताई माने, झारगडवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गोरख बोरकर, सरपंच पदमनाभ निकम, माजी सरपंच नितीन शेडगे, उपसरपंच सोनाली करे, अनंत सहकारी सोसायटीचे चेअरमन राहुल साळुंके, हनुमंत झारगड, छत्रपती शिक्षण संस्थेच्या शिक्षिका टूले मॅडम, सतीश ( फौजी ) कुलाळ, सुखदेव निकम, डॉक्टर उल्हास टुले, रमेश बोरकर, अविनाश जाधव, अंकुश निकम, बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संस्थेचे सचिव संतोष राऊत, राहुल चव्हाण, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब साळुंके यांनी तर आभार संजय निकम यांनी मानले.

सुप्रिया निकम हिची उतुंग भरारी..

माझी नुकतीच एमपीएससी मधून राजपत्रित तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. झारगडवाडी गावचं नाव मी पुढे नेले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, पण आता इथेच थांबणार नाही तर यूपीएससीच्या माध्यमातून देश पातळीवर नाव कोरण्याचे माझं ध्येय आहे माझ्या घरातील सर्व शेतकरी आहेत. माझ्या घरच्यांची इच्छा नसताना देखील त्यांच्या मनाविरोधात मी कृषी क्षेत्रात पाऊल टाकले आणि ते पूर्णही करून दाखवले यामुळे माझ्या आई वडील आणि कुटुंबीय समाधानी आहेत. मी कृषी चे पहिले शिक्षण बारामतीच्या कृषी महाविद्यालयात पूर्ण केले. पुढील शिक्षण महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी पूर्ण केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून माझी तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली मी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून यश संपादन केले आहे. पण मी इथेच न थांबता जिल्हा कृषी अधिकारी म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे, लवकरच ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण गावकऱ्यांनी आणि माझ्या कुटुंबियांनी सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते मी मुलींना एवढेच सांगते कुठेही खचून जाऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करत रहा यश नक्कीच मिळते असं नवनिर्वाचित तालुका कृषी अधिकारी झालेल्या सुप्रिया निकम हिने मुलींना सल्ला दिला आहे..


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.