झारगडवाडीत धनगर बांधवाकडून राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको आणि मुंडन आंदोलन.. बारामती : राज्यभर धनगर बांधवाकडून निषेध आंदोलने केली जात आहेत. एस टी चे आरक्षण मिळवण्यासाठी अहमदनगर येथील चौंडी या ठिकाणी काही धनगर बांधव गेली १५ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ पाठींबा देत बुधवारी ( ता. २०) बारामती तालुक्यातील झारगडवाडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बारामती वालचंदनगर रोडवर रास्ता रोको करत मुंडन आंदोलन धनगर बांधवाकडून करण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आरक्षणाच्या अंमलबजावणीची शिफारस न करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणाबाजी करत राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलना दरम्यान राजेंद्र बोरकर, संघर्ष मासाळ, आप्पासाहेब कोळेकर, सतीश कुलाळ, बापूराव सोलणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आंदोलन ठिकाणी ठेवण्यात आला होता. यावेळी राजेंद्र बोरकर, नारायण कोळेकर, सतीश (फौजी) कुलाळ , दा...
News, Intertentenment, Information