अनंत विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सखाराम मासाळ
बारामती : बारामती तालुक्यातील अनंत विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सखाराम मासाळ, तर उपाध्यक्षपदी महादेव भोंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष राहुल साळुंके, तर महादेव भोंग यांनी उपाध्यपदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. यामुळे या जागेवर निवडणूक लागलेली होती. बारामती प्रशासकीय भवन येथील सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी अमर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.
यावेळी संस्थापक सदस्य दयाराम महाडीक, मावळते अध्यक्ष राहुल साळुंके, उपाध्यक्ष महादेव भोंग, धनंजय निकम, विजयकुमार निकम, अभिजीत महाडिक, राजेंद्र साळुंके, महादेव जाधव, ऋतुराज जाचक, सौ. शुभांगी महाडिक, श्रीमती अनिता निकम, सचिव मधुकर निकम, सहसचिव अविनाश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
दयाराम महाडिक - कुठलाही खंड न पडता जरवर्षी प्रमाणे सभासदांना लाभांश वाटप केला जातो यावर्षी देखील जास्तीचा लाभांश कसा देता येईल याकडे संचालक मंडळाचे नियोजन असणार आहे. सध्या सोसायटीचा शंभर टक्के वसूल झालेला आहे. यामुळे सभासदांना यावर्षी चांगला लाभांश देण्याचे नियोजन असल्याचे संस्थापक सदस्य दयाराम महाडिक यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा