बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे" नांव.. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संस्थेचे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती” असे नामकरण करण्याचा निर्णय शासनाने आज चौंडीच्या कार्यक्रमात घेण्यात आला आहे.. राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी हा निर्णय प्रसिद्ध केला आहे.. त्यानुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयने आयुक्त यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.. यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होणार आहे.. याबाबत पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष एडवोकेट गोविंद देवकाते यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्याकडे सहा महिन्यापासून पाठपुरावा सुरू ठेवला होता आता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज नावाची घोषणा केली आहे.. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ०३. जानेवारी २०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता मिळाली होती. ...
News, Intertentenment, Information