डोर्लेवाडीच्या (ता.बारामती) ग्रामीण भागातील दुसऱ्या वर्षीचा दहीहंडीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा
डोर्लेवाडीच्या (ता.बारामती) ग्रामीण भागातील दुसऱ्या वर्षीचा दहीहंडीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा..
सहेली फाउंडेशन व राष्ट्रवादी युवती काँगेसच्या बारामती तालुका उपाध्यक्षा रोहिणी आटोळे खरसे यांच्या वतीने पार्थ दादा पवार दहीहंडी उत्सव..बारामती : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील दहीहंडी गुणवडीच्या जय भवानी दहीहंडी संघातील गोविंदांनी पाच थर लावून फोडली आणि प्रथम क्रमांकाचा पार्थ चषक मिळविला. ही दहीहंडी सहेली फाउंडेशन व राष्ट्रवादी युवती काँगेसच्या बारामती तालुका उपाध्यक्षा रोहिणी आटोळे खरसे यांच्या वतीने पार्थ दादा पवार दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. हा डोर्लेवाडीच्या (ता.बारामती) ग्रामीण भागातील दुसऱ्या वर्षीचा दहीहंडीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला.
डोर्लेवाडी येथील पार्थ दादा पवार दहीहंडी महोत्सवाचे उद्घाटन पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती दुध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, माजी सरपंच पांडुरंग सलवदे, संग्रामसिंह देवकाते, हरिभाऊ आटोळे, अॅड पंढरीनाथ नाळे, अविनाश काळकुटे, रामभाऊ कालगावकर, अॅड अतुल भोपळे, अमोल शिंदे, राहुल शिंदे, सुभाष नाळे, गजानन नाळे आदींसह ग्रामस्थ दहीहंडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दहीहंडी उत्सवाची मुख्य आकर्षण असलेल्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांनी दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या बरोबर डीजे च्या तालावर नृत्य देखील सादर केले. शेवटी गुणवडीच्या जय भवानी दहीहंडी संघाने पाच थर लावून दहीहंडी फोडली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडलेल्या संघातील गोविंदांना चषक देण्यात आला. या दहीहंडी महोत्सवाचे सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी तर आभार अजित दळवी यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा