झारगडवाडी गावांमध्ये भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा..
जुन्या पिढीने सुरू केलेली ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची प्रथा 41 वर्षापासून आजही अखंडपणे सुरू..
झारगडवाडीत सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ज्ञानात भर घालणारी नागरिकांना पर्वणीच..
नवनाथ बोरकर..
झारगडवाडी : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावांमध्ये भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली 41 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. मानवी जीवनाचा उध्दार करून घ्यावयाचा असेल तर अध्यात्म मार्ग आणि ईश्वरचिंतनाशिवाय पर्याय नाही. कलियुगामध्ये मानवी जीवन सुखी आणि भौतिक साधनाने संपन्न बनविण्यासाठी सर्व प्राण्यांची धडपड चालू आहे. परंतु खऱ्या अर्थाने ते प्राप्त होत नाही म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर सुख समाधान शांती आहे तो मार्ग जर आपण आपलासा केला तर जीवनाचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही. याच उद्देशाने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करीत कृपया या ज्ञानदानाचा तन-मन-धनाने अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान झारगडवाडीत अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील हजारो ग्रामस्थ अगदी लहानापासून वयोवृद्ध पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभाग घेतात. ग्रंथ वाचन हरिपाठ किर्तन ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, युवक आवर्जून हजर असतात. मोबाईलच्या युगात तरुणाई बेधुंद झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे मात्र झारगडवाडी मध्ये गेली 41 वर्षापासून अखंडपणे हरिनाम सप्ताह सुरू आहे यात वयोवृद्दा पासून गावातील युवकांचे मोठे योगदान आहे.
झारगडवाडीत सात दिवस कीर्तनकार पुढील प्रमाणे..
श्री. हभप. अच्युत महाराज शिंदे तवशी, श्री. हभप. अनिल महाराज पाटील बार्शी, श्री.ह.भ.प. प्रा. अमोल महाराज सूळ मोरोची, श्री.ह.भ.प. शिवाजी महाराज पहाणे तक्रारवाडी, श्री. ह.भ.प. गुरुवर्य स्वप्नील महाराज पवार फोंडशिरस, श्री. ह.भ.प. नाना महाराज सूर्यवंशी भागवताचार्य आळंदी, कृष्ण जन्मोत्सव कीर्तन व दीपोत्सव व दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन होणार आहे . श्री.ह.भ.प. पोपट महाराज पाटील खानदेश भूषण जळगाव यांचे होणार आहे. ७ तारखेला श्री. ह.भ.प.महादेव महाराज पळसदेवकर सिंधवेडकर, जि. जालना यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
चौकट : विशेष म्हणजे सप्ताहाच्या आयोजकाकडून आलेल्या गावातील सर्व ग्रामस्थांना महाभोजनाची व्यवस्था केली जाते हे या गावातील पारायण सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. रोज हजारो महिला पुरुष सायंकाळच्या वेळी किर्तन ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात हा गावात असलेला सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे एक प्रकारे भाविक भक्तांच्या ज्ञानात भर घालणारी पर्वणीच ठरत आहे. यंदाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे याच गावातील पुण्यामध्ये आयटी क्षेत्रामध्ये नोकरी करीत असलेल्यांचे महत्वाचे योगदान लाभलेले आहे. या अखंड सोहळ्याचे 41 वे वर्ष असल्याने गावातील 15 युवकांनी 41 हजार रुपयाची देणगी देऊन आपलं गाव वरचे असलेले प्रेम देणगीच्या माध्मातून व्यक्त केले आहे. यामुळे या सर्व 15 युवकाचं कौतुक होत आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा