झारगडवाडीत पार्थ दादा युथ फाऊंडेशन दहीहंडी उत्सवा निमित्त पाहिला मिळणार गौतमी पाटील चा जलवा..
![]() |
| कार्यक्रम स्थळ - झारगडवाडी पालखी मैदान |
सबसे कातिल म्हणून गौतमी पाटील ची ओळख निर्माण झालेल्या गौतमी पाटील ला पाहण्यासाठी झारगडवाडी करांना लागून राहिलीय उत्सुकता..
बारामती : झारगडवाडीत पार्थ दादा युथ फाऊंडेशन आयोजित दहीहंडी उत्सव शुक्रवारी ( ता.१५ ) बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावामध्ये पार पडणार आहे. नृत्यांगना गौतमी पाटील हीचा जलवा या दहीहंडी उत्सवा दरम्यान पहायला मिळणार आहे.. हा कार्यक्रम झारगडवाडी येथील पालखी मैदान या ठिकाणी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे.. कार्यक्रम स्थळी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे..
सबसे कातिल म्हणून गौतमी पाटील ची ओळख निर्माण झाली आहे. गौतमी पाटील हिचा महाराष्ट्रात कुठेही कार्यक्रम म्हटलं की गर्दी आलीच यामुळे गौतमी पाटील च्या कार्यक्रमासाठी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची अक्षरशा दमछाक होत असते.. नृत्यांगना गौतमी पाटील हीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई कडून हुल्लड बाजी पहायला मिळते.. मात्र गौतमी पाटील पहिल्यांदाच बारामती तालुक्यातील झारगडवाडी या ठिकाणी येत असल्याने महिला वर्गांमध्ये तिला पाहण्यासाठी उत्सुकता लागून राहिली आहे..
* पार्थ दादा युथ फाऊंडेशन आयोजित दहीहंडी उत्सव निमित्त युवा नेते पार्थ दादा पवार, माजी मंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर आणि तालुक्यातील विविध संस्थेवरील पदाधिकारी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.. त्याच बरोबर नृत्यांगना गौतमी पाटील हिचा परफॉर्मन्स पहिल्यांदाच झारगडवाडी गावांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. येथील नागरिक आणि महिला वर्गाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळावा आणि तो चांगल्या पद्धतीने पार पडावा यासाठी शुक्रवारी सायंकाळी कार्यक्रम स्थळी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बोरकर यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा