मुख्य सामग्रीवर वगळा

सोनगांव, झारगडवाडी येथील महादेव मंदिरात श्रावणातील शेवटच्या चौथ्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी..

सोनगांव येथील सोनेश्वर मंदिरात आणि झारगडवाडी येथील महादेव मंदिरात श्रावणातील शेवटच्या चौथ्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी..

बारामती  : क-हा व निरा नदीच्या पवित्र संगमावर वसलेले बारामती तालुक्यातील सोनगांव येथील जागृत देवस्थान असलेल्या सोनेश्वर मंदिरात आणि झारगडवाडी येथील महादेव मंदिरा आज श्रावण महिन्यांतील शेवटच्या चौथ्या सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच अलोट गर्दी झाल्याचे पहायला मिळाली. सोनगांव येथील मंदिरात राज्यभरातून हजारो भाविकांनी येत दर्शन घेतले. याचबरोबर मंदिराकडे जाण्यासाठी कऱ्हा- नीरा नदीतील नौका विहाराचा आणि पर्यटनाचा देखील आनंद घेतला आहे.

श्री सोनेश्वर मंदिर हे पुणे जिल्यातील प्रमुख संगम क्षेत्रातील क-हा निरा नदीच्या पवित्र संगमावर बारामती पासून बारा किलोमीटर पूर्वेला वसलेले आहे. निरा व भीमा संगम व तेथून भीमा चंद्रभागा नाम पावून पंढरपूर क्षेत्री हा प्रवाह जातो. भीमा शिवरूप, निरा विश्वरूप व क-हा ब्रह्मरूप समजली जाते. त्याच्या निर्मितीच्या आख्यायिका पारंपरिक पौराणीक पद्धतीने प्रचलित आहेत. क-हा किंवा पौराणीक नाम करीयागंगा तीरावर उगमापासून ( म्हणजे जेजुरी गडाच्या जवळ ) अकरा लिंगे व त्याची भारणसूद महादेव मंदिरे आज काही सुस्थितीत तर बरीच दुरावस्थेत आहेत. व त्यापैकीच सुस्थितीत असलेले सोनगाव हे पुरातन मंदिर आहे. पौराणीक माकॅडेय श्रषीॅनी श्री शिवकृपेने कल्प आयुष्य प्राप्त झाल्यावर त्यांनी शिव आराधना व त्या अनुषंगाने काल व्यतीत करण्याचे ठरवून त्याप्रमाणे दुर्गम व दिनदुबळयासाठी शंकराच्या बलाढ्य भुते शक्तीच्या साहाय्याने 11 शिवमंदिरे स्थापन केली. श्री माकॅडेय श्रषीमुळे ही स्थाने शिवकृपेने जागृत समजली जातात बारामती कसबा येथील श्री काशिविश्वेश्वर, मेडद येथील भीमाशंकर व श्री सोनेश्वर हे अकरावे मंदिर आहे. या ठिकाणी परिसाचा नंदी होता, सुवर्णलिंग आणि सोन्याचा कळस होता म्हणून त्यास सोनेश्वर म्हटले जाते, अशी या सोनगांव ( बारामती ) मधील सोनेश्वर मंदिराची अख्यायिका आहे.

हे मंदिर कऱ्हा नीरा नदीच्या संगमावर वसलेले आहे या ठिकाणी दोन्ही नद्यांचा संगम असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात असते. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे यामुळे भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. कुठलीही अडचण येऊ नये म्हणून भाविकांना दर्शनासाठी ये जा करण्यासाठी लाकडी नौका विहाराच्या माध्यमातून कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे दर्शना बरोबर पर्यटनाचा देखील आनंद भाविकांना या ठिकाणी मिळत असतो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.