झारगडवाडीत धनगर बांधवाकडून राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको आणि मुंडन आंदोलन..
बारामती : राज्यभर धनगर बांधवाकडून निषेध आंदोलने केली जात आहेत. एस टी चे आरक्षण मिळवण्यासाठी अहमदनगर येथील चौंडी या ठिकाणी काही धनगर बांधव गेली १५ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ पाठींबा देत बुधवारी ( ता. २०) बारामती तालुक्यातील झारगडवाडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बारामती वालचंदनगर रोडवर रास्ता रोको करत मुंडन आंदोलन धनगर बांधवाकडून करण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आरक्षणाच्या अंमलबजावणीची शिफारस न करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणाबाजी करत राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलना दरम्यान राजेंद्र बोरकर, संघर्ष मासाळ, आप्पासाहेब कोळेकर, सतीश कुलाळ, बापूराव सोलणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आंदोलन ठिकाणी ठेवण्यात आला होता.
यावेळी राजेंद्र बोरकर, नारायण कोळेकर, सतीश (फौजी) कुलाळ , दादासो बोरकर, रणजीत बोरकर, आप्पासाहेब कोळेकर, आजिनाथ बुरुंगले, गोरख बोरकर, संतोष मासाळ, प्रशांत बोरकर, प्रवीण बोरकर, नितीन मासाळ, संघर्ष मासाळ, राहूल झारगड, बापूराव सोलनकर, पप्पू मासाळ, मच्छिंद्र झारगड, राजेंद्र झारगड, अमोल बोरकर, राहुल कुलाळ, अमोल करे, गणेश बोरकर, भीमराव कोळेकर, भाऊसो करे, दादासो नरोटे, खंडेराव करे, आदी धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील धनगर समाज एसटीचे आरक्षण मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षापासून आंदोलन करत आहेत. आरक्षण मिळवण्यासाठी अहमदनगर येथील चौंडी या ठिकाणी काही धनगर बांधव गेली १५ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत यातील एक जनची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे मात्र अजून काही आंदोलन कर्ते उपोषणावर ठाम असून आता त्यांनी पाणी देखील त्याग केले आहे. दोन दिवसांमध्ये राज्य सरकारने चर्चा करून मार्ग काढावा अन्यथा चर्चा देखील बंद केली जाईल असा इशाराच धनगर आंदोलन कर्त्याकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे. यामुळे आता राज्य सरकार नेमकी काय पावले उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा