मुख्य सामग्रीवर वगळा

झारगडवाडीत गौतमी पाटील च्या डान्स शो मुळे तरुणाई घायाळ..

झारगडवाडीत गौतमी पाटील च्या डान्स शो मुळे तरुणाई घायाळ..

पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने झारगडवाडीत आयोजित दहीहंडी उत्सवाला महिला बरोबर तरूणाई ची तुफान गर्दी..

( वार्तांकन - नवनाथ बोरकर )

झारगडवाडी : बारामतीतील झारगडवाडीत शुक्रवारी (ता. १५) पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला झारगडवाडी व पंचक्रोशीतील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना गौतम पाटील होती. गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी महिलांबरोबर तरुणाईने देखील प्रचंड मोठी गर्दी केली होती. गौतमीने केलेल्या अदाकारी नृत्याने झारगडवाडी करांची मने जिंकली.


यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर, माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद विश्वासराव देवकाते,सोलापूरचे उपमुख्याधिकारी माणिकराव बिचकुले, छत्रपती कारखाना चेअरमन प्रशांत काटे, दूधसंघाचे चेअरमन बारामती पोपटराव गावडे, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, मदनराव देवकाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, बारामती दूधसंघाचे संचालक संजय देवकाते, भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य मच्छिंद्र टिंगरे, संजय गांधी निराधार योजना माजी अध्यक्ष किरण तावरे, दूधसंघाचे माजी अध्यक्ष संदीप जगताप,पंचायत समितीचे माजी संचालक राहुल झारगड, झारगडवाडी ग्रामपंचायत चे सरपंच अजित बोरकर, आरटीओ हेमंतकुमार सोलनकर, श्रीकांत माने (उद्योजक), कार्तिक नाळे (उद्योजक) आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. पार्थ पवार युथ फाऊंडेशनचे मार्गदर्शक राजेंद्र बोरकर, दहीहंडी उत्सवाचे आयोजक - बंटी (नाना) बोरकर, रणजित बिचकुले, प्रमोद बोरकर, सचिन थोरात, अड.अनिल शेडगे, ओंकार बोरकर, सतिश बिचकुले, देवा निकम, महेश मासाळ हे होते.


महाराष्ट्रात कुठेही गौतमी पाटील चा कार्यक्रम म्हटलं की गोंधळ होतोच, पण झारगडवाडी ( बारामती ) येथे पार पडलेल्या दहीहंडी उत्सवानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन पार्थ पवार युथ फाउंडेशन च्या आयोजकाकडून करण्यात आले होते. तसेच बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि बारमती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी देखील चांगल्या प्रकारे साथ दिली. त्याचबरोबर झारगडवाडी गावातील माजी सैनिक सतीश कुलाळ व त्यांच्याबरोबर आलेल्या बाउन्सरने देखील चांगली सुरक्षा दिल्याने यामुळेच गौतमी पाटील च्या कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही यामुळे आलेल्या महिला वर्गांना देखील गौतमी पाटील चा कार्यक्रम व्यवस्थितपणे पाहता आला त्यामुळे महिलांनी देखील आयोजकांचे आणि पोलिसांचे आभार मानले.

*झारगडवाडी ( बारामती ) येथील कार्यक्रमा दरम्यान आयोजकांकडून अतिशय शिस्तबद्ध नियोजन केल्याने माझ्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ झाला नाही यामुळे येथील दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांचे नियोजन मला खूप आवडले त्यामुळे मला देखील माझा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडता आला. - गौतमी पाटील*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.