झारगडवाडीच्या सरपंचपदी विराजमान होताच केला कामाचा श्री गणेशा..
सरपंच पदी विराजमान होताच दुसऱ्याच दिवसापासून पदाधिकाऱ्या समवेत केली मंदिर परिसराची स्वच्छता..झारगडवाडी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच अजित दिलीप बोरकर हे सरपंच पदी विराजमान होताच दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी पदाधिकाऱ्या समवेत झारगडवाडी येथील गणेश मंदिर परिसरात स्वच्छता करत कामाचा श्री गणेशा केला आहे. यामुळे या तरुण सरपंचाचे पॅनल प्रमुख व सर्वांकडून तोंड भरून कौतुक होत आहे..
यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता करण्यासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर बारामती बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बोरकर, माजी सरपंच नितीन शेडगे, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख बोरकर, संतोष मासाळ, रामभाऊ करे, हनुमंत झारगड, अविनाश जाधव, ग्रामपंचायत क्लार्क अनिल माने, शिपाई अजित आवटे यांनी परिश्रम घेतले.
योगायोगाने आज चतुर्थी आहे आणि माझी झारगडवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी निवड झाली आहे. खऱ्या अर्थाने मला बाप्पाचा आशीर्वाद मिळाला आहे. यामुळे आजच मी या गणेश मंदिर परिसराची स्वच्छता करून कामाचा श्रीगणेशा केला आहे. गावात अनेक समस्या आहेत त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि गावामध्ये इथून पुढच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून विकास कामे करण्याचे माझे ध्येय असल्याचे नवनिर्वाचित सरपंच अजित बोरकर यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा