झारगडवाडीत सरपंच पदाच्या निवडणुकीत रंगला हाय होल्टेज ड्रामा..
झारगडवाडीच्या सरपंच पदी अजित बोरकर यांची निवड..
डोर्लेवाडी : झारगडवाडी ( बारामती ) येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचे चित्र आज बुधवारी ( ता.५ ) पाहायला मिळाले. विरोधी गटाकडे विजयाची समीकरणे नसताना देखील आपण विजयी होऊ? अशा भ्रमात असलेल्या विरोधी गटाला सरपंच पदाच्या निवडणुकीत चांगलीच चपराक बसली आहे. यामध्ये जय भवानी माता पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार अजित दिलीप बोरकर यांची झारगडवाडी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी आज निवड झाली. यामध्ये अजित बोरकर यांना १५ पैकी ९ मते तर विरोधी निवडणूक लढत असलेल्या अजित बुरुंगले यांना १५ पैकी ६ मते मिळाली यात ३ मते अजित बोरकर यांना जास्त मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सय्यद एन. पी. यांनी त्यांना विजयी घोषित केले. त्यांच्या समवेत पारवे जी.एन, ग्रामविकास अधिकारी शहानुर शेख यांनी या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये काम पाहिले.
यावेळी जय भवानी माता पॅनलचे प्रमुख छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, बारामती बाजार समितीचे संचालक दयाराम महाडिक, बारामती बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बोरकर, सुखदेव निकम, उपसरपंच सोनाली करे, माजी सरपंच वैशाली मासाळ, माजी सरपंच नितीन शेडगे, माजी उपसरपंच वैष्णव बळी, ग्रामपंचायत सदस्य अनिता जाधव, कल्पना झारगड, पुनम आवटे, मालन टिंगरे, माजी उपसरपंच सोनाली चव्हाण, माजी सरपंच धनाजी निकम, सतीश (फौजी) कुलाळ, संजय बळी, संतोष मासाळ, पप्पू कोळेकर, महेश झारगड, सतिश बिचकुले, अक्षय आवटे, अविनाश जाधव, निलेश कालगावकर, राहुल बिचकुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष गोरख बोरकर, सुखदेव निकम, रमेश झारगड, रमेश बोरकर, शिवाजी बोरकर, दत्तात्रय झळक, जगदीश बोरकर, गोपीनाथ बोरकर, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा