केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या योगेश बोरकर चा झारगडवाडी ग्रामस्थांकडून भव्य नागरी सत्कार..
बारामती : जिद्द आणि चिकाटी असेल तर आकाशाला गवसणी घालता येते त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. कठोर परिश्रम घेत बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील योगेश बाळासाहेब बोरकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणे सोपी गोष्ट नाही यासाठी रात्रं दिवस अभ्यास करावा लागतो योगेश ने मिळवलेले यश हे आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. असे गौरवोद्गार सोलापूर जिल्ह्याचे उपमुख्याधिकारी माणिकराव बिचकुले यांनी काढले. योगेश बोरकर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये इंडियन फॉरेस्ट ऑफिसर ची परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांचा झारगडवाडी ग्रामस्थांच्या वतीने गावामधून मिरवणूक काढत भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, माळेगाव कारखान्याचे संचालक मदनराव देवकाते, जी बी गावडे, बारामती दूध संघाचे चेअरमन पोपटराव गावडे, संजय देवकाते, श्रीपती जाधव, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बोरकर, पंचायत समितीच्या माजी सभापती रंजनाताई बोरकर,भाजप नेते मच्छिद्र टिंगरे, बारामती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब बोरकर, दादासाहेब बोरकर, चंद्रकांत बोरकर, रणजीत बोरकर, झारगडवाडी चे सरपंच अजित बोरकर, माजी सरपंच नितीन शेडगे, माजी सरपंच संतोष मासाळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्र्वासराव देवकाते यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त युवकांनी वळावे. झारगडवाडी गावामध्ये यूपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. यावेळी विविध संस्थांच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन फॉरेस्ट ऑफिसरच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल योगेश बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले तर प्रास्ताविक राजेंद्र बोरकर व आभार नारायण कोळेकर यांनी मानले.
स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर मोबाईल पासून अलिप्त राहणे गरजेचे आहे. सध्या तरुण वर्गामध्ये मोबाईल व सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे. मी स्पर्धा परीक्षा करीत असताना मोबाईल बंद ठेवून बारा ते चौदा तास अभ्यास केला आहे त्यामुळे मला हे यश संपादन करता आले असे यश संपादन केलेल्या योगेश बोरकर यांनी युवकांना सांगितले.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा