डोर्लेवाडी ( बारामती ) येथील विद्यालयात ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..
ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष निलेश पोटे यांचा कौतुकास्पद उपक्रम..
डोर्लेवाडी : ज्ञानगंगा सेवाभावी संस्था महाराष्ट्र (पुणे) यांच्यामार्फत शनिवारी (ता.१ ) बारामती तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी या विद्यालयात १०० विद्यार्थ्यांना A4 साईजच्या प्रत्येकी तीन अश्या एकूण ३०० वह्या, ३०० पेन व ३०० पेन्सिल अश्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा व बाल कामगार कायदा याविषयावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मावळ येथील जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष अडव्होकेट माऊली भाऊ सोनवणे, अडव्होकेट प्रणिता जावळे, ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव, झारगडवाडीचे माजी सैनिक सतीश कुलाळ, झारगडवाडी ग्रामपंचायत चे सदस्य अजित बोरकर, ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष युवराज पोटे, सामाजिक कार्यकर्ते योगेश नाळे, डोर्लेवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक साळवे एस. पी, पर्यवेक्षक खराटे डी. डी. आदी मान्यवर उपस्थित होते.
पोस्को कायदा हा अनेक देशांमध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता मात्र आपल्या भारतात 2012 साली हा कायदा लागू झाल्याने बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी हा कायदा कवच बनले आहे. या कायद्याची अत्यंत गरज होती सध्याचे युग हे डिजिटल युग आहे या डिजिटल युगात मोबाईल हे सगळ्यांचेच प्रभावी माध्यम बनले आहे. यामध्ये मोबाईलचा अतिरेक चांगल्या आणि वाईट गोष्टीसाठी वापर केला जात आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे अनोळखी व्यक्तींबरोबर ओळख निर्माण होते यामुळे लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचे चित्र अनेक वेळा घडलेल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी शक्यतो मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा असे आवाहन बारामतीच्या अडव्होकेट प्रणिता जावळे यांनी विद्यार्थ्यांना केले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा