मुख्य सामग्रीवर वगळा

झारगडवाडीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर पडले पार..



22 जुलै 2023..


झारगडवाडीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर पडले पार..



झारगडवाडीचे युवा सरपंच अजित बोरकर यांच्या पुढाकारातून गोरगरिबांसाठी समाज उपयोगी आरोग्य शिबिर..

झारगडवाडी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 64 व्या वाढदिवसा निमित्त शनिवारी ( ता. २२ ) प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी ( बारामती ) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन झारगडवाडी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराला झारगडवाडी व परिसरातील ग्रामस्थांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये अस्थिरोग ( हाडाची ) तपासणी, दातांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच जनरल मेडिसिन व हृदयरोग तपासणी करण्यात आली. यात शेकडो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूराव दडस आणि त्यांच्या सर्व कर्मचारी स्टाप ने मोलाचे सहकार्य केले.

यावेळी छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दयाराम महाडिक, माजी संचालक राजेंद्र बोरकर, झारगडवाडी गावचे सरपंच अजित बोरकर, माजी सरपंच नितीन शेडगे, माजी सरपंच वैशाली मासाळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष गोरख बोरकर, बापूराव मासाळ, रामभाऊ करे, हृदयरोग तज्ञ डॉ. स्वप्नील खोमणे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अजिंक्य लवटे, दंत चिकित्सक डॉ. केतकी नाळे, नेत्ररोग तज्ञ डॉ. स्नेहल काळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. बापूराव दडस, प्रयोगशाळा तज्ञ सुप्रिया सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार झारगडवाडी चे ग्रामविकास अधिकारी शहानुर शेख यांनी मानले.

राजेंद्र बोरकर - ( बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक )-  झारगडवाडीचे युवा सरपंच अजित बोरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली होती त्याचप्रमाणे त्यांनी आज आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  समाज उपयोगी आरोग्य शिबिर राबवले आहे त्याबद्दल सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो. अशाच प्रकारे इथून पुढे देखील समाज उपयोगी कार्यक्रम घ्यावेत. तसेच आपले लाडके नेते उपमुख्यमंत्री अजित दादा हे राज्याच्या मुख्यमंत्री व्हावेत. अशा शुभकामना त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो असे राजेंद्र बोरकर म्हणाले.


नारायण कोळेकर - ( छत्रपती कारखान्याचे संचालक )- झारगडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले यात वेगवेगळ्या अवयवाची चिकित्सकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली अशा आरोग्य शिबिरातून गोरगरिबांना लाभ मिळतो यामुळे इथून पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीने आरोग्य शिबिरे राबवणे गरजेचे आहे. अजित दादांनी देखील नागरिकांच्या आरोग्यासाठी बारामतीमध्ये आरोग्यदालने उभा केली आहेत याचा फायदा बारामती तालुक्यातीलच नव्हे तर इतर तालुक्यातील गोरगरीब जनतेला देखील होत आहे. आणि अशा काम करणाऱ्या आमच्या नेत्याला चांगले आरोग्य लाभो त्यांच्या हातून देशाची राज्याची सेवा घडो अशा शुभेच्छा नारायण कोळेकर यांनी दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.