मुख्य सामग्रीवर वगळा

अखेर कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची झाली घोषणा..


अखेर कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची झाली घोषणा..

ओबीसी नेते, धनगर समाजाचे सुपुत्र सिध्दरामय्या होणार कर्नाटक राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री..

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा अखेर झाली , राज्यातील ओबीसी आणि मागासवर्गीयांचे प्रभावशाली नेते म्हणून ओळख असलेल्या सिध्दरामय्या यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. या निवडीनंतर कर्नाटकसह महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील धनगर समाजात उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी सिध्दरामय्या यांनी २०१३ ते २०१८ अशी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. कर्नाटकच्या राजकारणात मागील चाळीस वर्षात सलग पाच वर्षे संधी मिळालेले ते एकमेव मुख्यमंत्री आहेत. म्हैसूरजवळील वरूणा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. वकिलीचे शिक्षण घेतलेले सिध्दरामय्या हे राज्यात मास लीडर म्हणून ओळखले जातात. यापूर्वी कर्नाटकात त्यांनी उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते अशा अनेक पदांवर काम केले आहे. ते सलग तेरा वर्षे अर्थमंत्री होते त्यावेळी सलग तेरा वर्षे अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकात आहे. ते कर्नाटकातील दबंग नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. कर्नाटकच्या विधानसभेच्या सभागृहातील त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत.

सिध्दरामय्यांच्या आक्रमकतेचा हा प्रसंग कर्नाटकात आजही लोक विसरले नाहीत!येडीयुरप्पा मुख्यमंत्री असताना सिध्दरामय्या विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी एका संवेदनशील विषयावर विरोधी पक्ष सभागृहात आक्रमक झाला होता. हा गोंधळ पाहून सत्ताधारी गटाने सभागृहात पोलीसांना बोलावून आक्रमक झालेल्या आमदारांना ताब्यात घ्यायला लावले होते. मुळात देशातील कोणत्याच कायदेमंडळाच्या सभागृहात पोलीस कारवाई करता येत नाही. मार्शलकडून कारवाई केली जाते. पण त्यावेळी कर्नाटकच्या विधानसभागृहात आमदारांना ताब्यात घेण्यासाठी आयपीएस अधिकारी आले होते. विरोधी पक्षनेते असलेल्या सिध्दरामय्यांनी "तुमच्या अंगावर वर्दी आहे म्हणून मान राखतोय, नाहीतर बुटासहीत लाथ घालून बाहेर हाकललं असतं " अशी गर्जना केली आणि पूर्ण सभागृह  अवाक् झाले. आजही राज्यात हा प्रसंग लोकांच्या मनात कायम आहे. त्यादिवशी आक्रमक विरोधी पक्षनेत्याचा रूद्रावतार पाहून सभागृहाच्या भिंतीही थरारल्या. असा सगळा प्रवास करीत ओबीसी नेते, धनगर समाजाचे सुपुत्र सिध्दरामय्या आता कर्नाटक राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत हे आता निश्चित झाले असून लवकरच ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.