यंदा मान्सून वेळेच्या तीन दिवस अगोदरच येणार; महाराष्ट्रात होणार मान्सूनचे या तारखेला आगमन..
महाराष्ट्रात सात जूनपर्यंत दाखल होणार मान्सून..
बारामती :
राज्यभरात गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा अधिकच वाढला आहे. त्यामुळे उकाडा जाणवत असून, अंगाची लाहीलाही होत आहे. अशा वातावरणात आता लोक पावसाची आतुरतेनं वाट पाहू लागले आहेत. केव्हा एकदाचा पाऊस पडेल अन् उकाड्यापासून केव्हा सुटका होईल अशी सर्वसामान्यांची अवस्था झाली आहे. यासंदर्भात हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे.
हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस. होसलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात १९ मे रोजी आगमन झाले. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रात सात जूनपर्यंत येणार मान्सून..
मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये पोहचला आहे. यामुळे यावर्षी मान्सून तीन दिवस उशीरा येणार होता. परंतु आता त्याची चाल अनुकूल राहिली तर केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होईल. हवामान विभागाने केरळमध्ये तीन ते चार जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मान्सून मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला येणार होता. परंतु आता मान्सून वेळेवर दाखल होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राज्यात ९६ टक्के पर्यंत सामान्य मान्सून होणार आहे. राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे. हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनची पुन्हा माहिती येणार आहे, त्यावेळी अधिक चित्र स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात आगमन झाल्यावर पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा