बारामतीतील एक अवलीया जोपासतोय चार दशकांपासून पियानो अँकॉर्डियन ची आवड..
अकॉर्डियन वाद्य वाजविणे फार जिकीरीचे आहे, पंधरा किलो वजनाचे अँकार्डियन गळ्यात घालून दोन अडीच तास स्टेज शो करणे गंमत नसते.. त्याच्या डाव्या भात्याच्या बाजूला 120 बटणे आहेत तर जिथून गाणे वाजविले जाते त्या काळ्या पांढ-या बटणांना ट्रेबल म्हणतात, या शिवाय डाव्या बाजूला पाच कपलर असतात.. एक कॉड तीन सुरांचा मिळून बनत असतो असे हे वाद्य वाजविणे ही खरच एक कला आहे... दरवर्षी 6 मे हा दिवस अकॉर्डियन दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो, नितीन दोशी यांना कोणीही न शिकवता ऐकून व पाहून त्यांनी हे वाद्य वाजवण्याची कला आत्मसात केली आहे.. आज हिंदी आणि काही मराठी चित्रपटातील अनेक गीते ते देशभरात फिरुन ते सादर करतात.. बारामतीसारख्या ग्रामीण भागात राहून प्रपंच सांभाळून त्यांनी ही आवड जाणीवपूर्वक जोपासली व ती कायम जागृत ठेवली आहे...
जुन्या जमान्यातील अनेक सुप्रसिद्ध गीते अँकार्डियन वर वाजवताना नितीन दोशी हे तल्लीन झालेले पाहायला मिळतात.. "रुप तेरा मस्ताना, तुम बिन जाऊ कहा, अच्छा जी मै हारी पिया, बार बार देखो, अकेले अकेले कहा जा रहे हो, मित ना मिला रे" या सारखी जुन्या जमान्यातील हिंदी असंख्य गीते तसेच "हवास मज तू, कुण्या गावाच आल पाखरु" ही मराठी गीते ते सुंदर पध्दतीने अँकार्डीयनवर सादर करतात.. पुणे, मुंबई, हैदराबाद, आग्रा या सह देशभरात ते काही सहका-यांसह अँकॉर्डियन वाजवितात.. त्यांच्या अकॉर्डियन वर फिरणाऱ्या बोटांनी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सुरांनी असंख्य रसिक तृप्त होऊन जातात..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा