भारतीय रिझर्व्ह बॅंकेने २ हजार रुपयांची नोट आता चलनातून केली बंद..
पुन्हा एकदा जनतेला धक्का..
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने २ हजार रुपयांच्या नोटा आता चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या तीन महिन्यात या नोटा मागे घेतल्या जाणार आहेत. ३० सप्टेंबरपूर्वी ग्राहकांना आपल्याकडील नोटा बदलून घेता येणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून सांगण्यात आले आहे.
२०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीवेळी बाजारात २ हजार रुपयांची नोट चलनात आली होती. मात्र २०१८-१९ मध्येच या नोटांची छपाई बंद करण्यात आली. आज रिझर्व्ह बॅंकेने या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे.
नोटा बदलून घेण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकाच वेळी केवळ २० हजार रुपयेच बदलून घेता येतील असेही रिझर्व्ह बॅंकेकडून जाहीर करण्यात आले आहे. मागील काही काळात २ हजाराची नोट बंद होणार अशी चर्चा होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे यामुळे आता पुन्हा ज्यांच्या कडे 2 हजारांच्या नोटा आहेत त्यांना बँकेत नोटा जमा करण्यासाठी रांगा लावाव्या लागणार आहेत..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा