मुख्य सामग्रीवर वगळा

बारामती तालुका पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या..

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक..

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आवळल्या मुसक्या..

बारामती तालुक्यातील जळोची एमआयडीसी येथे झालेल्या खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि बारामती तालुका पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गुरुवार (दि. ९ ) ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी जळोची येथील पानशॉपवर थांबले असताना आरोपी गणेश माने, प्रथमेश गवळी, विनोद जाधव व इतर चार अनोळखी इसम मोटारसायकलवर येऊन फिर्यादीला "तु गणेश वाघमोडे याच्यासोबत का फिरतोस? माझी माफी माग!” असे म्हणाले. यावेळी प्रथमेश गवळी याने "याला ठेवायचे नाही" असे म्हणत त्याच्याजवळील कोयत्याने फिर्यादीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी "आम्ही इथले भाई आहोत" असे म्हणत कोयता हवेत फिरवत घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. संदीपसिंह गिल्ल यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. अटक आरोपी जयेश माने याने बारामती शहरामध्ये साथीदारांसह गेल्या वर्षी खून केलेला आहे त्यात जेलमध्ये होता. आणि दीड महिन्यापूर्वी जेलमधून सुटलेला आहे.या दोन्ही बाजूच्या आरोपींचा जुलै २०२३ मध्येही वाद झाला होता. त्यावेळी जयेश माने याला मारहाण करण्यात आली होती. त्याच्या फिर्यादीवरून गणेश वाघमोडे, गौरव सूळ व इतरांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफिने कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे.

      ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्दशन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, सहा. फौजदार एस. जे. वाघ, पो. हवा. खारतोडे, पो. हवा. स्वप्नील अहिवळे, स्था. गु. शाखा पुणे ग्रामीण पो. शि. होळंबे, शकील शेख आदींनी केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.