मुख्य सामग्रीवर वगळा

बारामती : तरुणाईने व्यसनापासून दूर राहणे हेच देशसेवेचे पहिले पाऊल.. चंद्रशेखर यादव

बारामती : तरुणाईने व्यसनापासून दूर राहणे हेच देशसेवेचे पहिले पाऊल.. चंद्रशेखर यादव

विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत अभियान' संपन्न..

विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत अभियान' कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव 
बारामती : व्यसन हे केवळ शरीराला नव्हे, तर मन आणि कुटुंबालाही पोखरणारे विष आहे. त्यापासूनच तरुणाईने दूर राहणे हेच खरे देशसेवेचे पहिले पाऊल आहे. व्यसनामुळे मानसिक आरोग्य बिघडते, हृदयरोग, नैराश्य आणि तणाव वाढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या व्यसनांच्या आहारी न जाता समाजात जागरूकतेचा दीप प्रज्वलित करावा,'असा संदेश बारामती तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात 'नशामुक्त भारत अभियानांतर्गत, जनजागृती कार्यक्रम' उत्साहात पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यादव यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यभर व्यसनमुक्त, निरोगी आणि उद्दिष्टपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा दिली. व्यसनामुळे होणारे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम त्यांनी हृदयस्पर्शी उदाहरणांसह स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.भरत शिंदे होते. त्यांनी बोलताना सांगितले की, 'आनंदी राहण्यासाठी शरीरातील डोपामाईन, सिरेटोनिन, ऑक्सिटोसिन आणि इंडॉर्फिन या 'हॅपी हार्मोन्स'ना सक्रिय ठेवा, व्यसनाशिवायही जीवनात आनंद मिळवता येतो.' यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात 'हॅपी हार्मोन्स'चा सहवास आणि नशेपासून दुरावा ठेवण्याचा सल्ला दिला. उपप्राचार्य प्रा.अंकुश खोत यांनीही शिस्तीचे व संयमाचे महत्त्व अधोरेखित केले. अभियानासाठी २५० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. भिमराव मोरे यांनी मनोगत व्यक्त करून मान्यवरांचा परिचय करून दिला, तर नोडल अधिकारी प्रा. विजय काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा.ज्योती जगताप यांनी आभार मानले.

चंद्रशेखर यादव ( पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस ठाणे ) :- संगतीमुळे व्यसनाधिनता लागते. त्यासाठी स्वतः संगत चांगली ठेवा. पालकांनीही आपली मुले कोणाच्या संगतीत आहेत? याची शहानिशा केली पाहिजे. ड्रग्स घेणे आणि विक्री करणे अशा गुन्ह्यांबाबत कायद्यात कडक शिक्षेची तरतूद आहे.त्यामुळे आपण यात गुंतणार नाही याची काळजी घ्या.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.