बारामतीत ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद...
बारामतीत ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद...
![]() |
| बारामतीत ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद... |
यावेळी ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष युवराज पोटे, सचिव योगेश नाळे,कार्याध्यक्ष अमोल यादव,महिला अध्यक्षा ऍड.माया खुंटे-पाळेकर,महिला उपाध्यक्षा रुपाली लोणकर कायदेशीर सल्लागार ऍड.अजित बनसोडे,ऍड.अनिकेत ननावरे, ऍड.सागर वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. छोट्या छोट्या मुलांच्या हाती वह्या आणि पुस्तके पोहोचल्याने पालक आणि शिक्षकवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले. मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ज्ञानगंगा सेवाभावी संस्था गेली तीन वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवत आहे."ज्ञान,प्रशिक्षण, संघटन आणि लढा" या संस्थेच्या घोषवाक्यानुसार शैक्षणिक क्षेत्रात मदतीचा हात देण्याचे काम संस्था करीत असून, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठा आधार मिळत आहे.युवराज पोटे : "जे जे आपणांसी ठावे,ते इतरांसी सांगावे"या उक्तीप्रमाणे शालेय साहित्य वाटपाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची ओढ निर्माण व्हावी आणि त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, हा संस्थेचा उद्देश असल्याचे ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष युवराज पोटे यांनी सांगितले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा