झारगडवाडीच्या स्मशानभूमीत शारदानगर ( बारामती ) येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांकडून वृक्षारोपण..
फोटो : झारगडवाडी ( बारामती ) येथील स्मशान भूमीत वृक्ष लागवड करताना झारगडवाडी चे सरपंच व कृषिकन्या..
बारामती : शारदानगर (बारामती ) येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील कृषि विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत झारगडवाडीत स्मशानभूमी परिसरात कृषीदिनानिमित्त वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. झारगडवाडीतील स्मशानभूमी परिसरात पिंपळ, वड, गुलमोहर अशा देशी झाडांच्या वाणाचे वृक्षारोपण करून विविध छायादार व सदाबहार झाडांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी गावचे सरपंच अजित बोरकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बोरकर, क्लार्क अनिल माने, तसेच गावातील ग्रामस्थ कृषीकन्या गायत्री शर्मा, गौरी गाढवे, नम्रता पाटील, समृद्धी घाडगे, अलसना सय्यद, विजयालक्ष्मी रुद्रमठ, साक्षी उकिरडे यानी त्यात सहभाग दर्शवला.
कोट : अजित बोरकर झारगडवाडी सरपंच म्हणाले, “स्मशानभूमी सारख्या ठिकाणी वृक्षलागवड केल्याने त्या ठिकाणी शांतता, सावली आणि स्वच्छता यांची वाढ होईल. हा उपक्रम गावासाठी एक प्रेरणा ठरेल.” स्मशानभूमीमध्ये हरित पट्टा निर्माण करून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने शारदानगर येथील कृषी महाविद्यालयातील आलेल्या कृषिकन्यांच्या वृक्ष लागवडीचा केलेला उपक्रम स्तुत्य असून कौतुकास्पद आहे.
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेचे चेअरमन राजेंद्र दादा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, प्रा. जया तिवारी, कार्यक्रम अधिकारी डॉ. मयूर पिसाळ, प्रा.शिवानी कोकरे देसाई, डॉ. पल्लवी कोळेकर ह्यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम शारदानगर येथील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी झारगडवाडी गावातील स्मशानभूमीत वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा