राज्य सरकारच्या वतीने प्रथमच जन्मगावी राष्ट्रपुरुष श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा दिमाखात होणार जयंती महोत्सव सोहळा
राज्य सरकारच्या वतीने प्रथमच जन्मगावी राष्ट्रपुरुष श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा दिमाखात होणार जयंती महोत्सव सोहळा...
![]() |
नवनाथ बोरकर बारामती...
बारामती : राष्ट्रपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा 332 वा जयंती महोत्सव रविवार (दि. 16) मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वा. जन्मगाव मुरूम ता. फलटण जि. सातारा होणार आहे. हा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती व मुरूम ग्रामपंचायत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहमध्ये व थाटामाटात होणार आहे.महाराष्ट्र राज्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई, युवक व क्रीडामंत्री दत्तामामा भरणे, बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील,ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर, माजी खासदार रणजीत निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, फलटण विधानसभेचे आमदार सचिन पाटील कांबळे उपस्थितीत राहणार आहेत.
मराठा साम्राज्याचे पहिले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर आणि अटकेपार झेंडे फडकवणारे व होळकरशाहीचे मुख्य आधारस्तंभ राहिले असून इतर प्रमुख महापुरुषाएवढेच त्यांचं राष्ट्रनिर्माणासाठी महान कार्य राहिले असून याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन यावर्षीपासून मोठ्या प्रमाणात जयंती करण्याचे सरकारने ठरवले आहे. लवकरच जन्मगावांमध्ये राष्ट्रपुरुष मल्हारराव होळकरांचा पराक्रमाला साजेशी मल्हारसृष्टी निर्माण करण्याचे कार्यसुद्धा सरकारने हातात घेतले आहे.या कार्यक्रमासाठी खासदार उदयनराजे भोसले, खासदार धर्यशील मोहितेपाटील, महादेव जानकर, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार उत्तमराव जानकर, आमदार नारायण पाटील, होळकर घराण्याचे वंशज भूषणराजे होळकर, माजी विधान परिषदेचे आमदार ॲड.रामहरी रुपनवर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजूबाबाराजे निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, अमरजीत बारगळ, सातारा चे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषद मुख्याधिकारी याशिनी नागराजन, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी ध्वजारोहण, गावातून पालखी सोहळा, प्रतिमापूजन, रक्तदान शिबिर, मान्यवरांचे सत्कार, प्रमुखांचे मार्गदर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने सर्वपक्षीय व मल्हारप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख शंकरराव माडकर, माणिकराव सोनवलकर, अँड.गोविंद देवकाते, मुरूम गावचे सरपंच योगेश संकपाळ यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा