मुख्य सामग्रीवर वगळा

सुप्रिया सुळे यांच्या पक्षाच्या बारामती युवक पदाधिकाऱ्याने घराकडे येणारा रस्ता अडवल्याने जागतिक महिला दिनी महिला करणार उपोषण.

सुप्रिया सुळे यांच्या पक्षाच्या बारामती युवक पदाधिकाऱ्याने घराकडे येणारा रस्ता अडवल्याने जागतिक महिला दिनी महिला करणार उपोषण...

झारगडवाडीतील महिला जागतिक महिला दिनी न्याय मिळण्यासाठी बारामतीच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर करणार लाक्षणिक उपोषण...

घराकडे येणारा शासकीय मंजूर असलेला रस्ता अड‌विल्याबाबत लाक्षणिक उपोषण..

बारामती : झारगडवाडी ( बारामती ) येथील जमीन गट नंबर ४६० मध्ये गेली साठ वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना रस्त्यापासून वंचित राहावे लागत आहे. सध्या हा रा. मा. १२० ते धुळदेव माणिक बोरकर या नावाने रस्ता जिल्हा परिषद च्या माध्यमातून मंजूर आहे. ६० वर्षापासूनचा वहिवाटीचा घराकडे येणारा रस्ता शरद पवार गटाचा बारामती तालुका युवक अध्यक्ष प्रशांत बोरकर याने राजकीय द्वेषापोटी आणि मानसिक त्रास देण्याच्या हेतूने रस्ता अडवला आहे. यामुळे आमच्या कुटुंबातील वयोवृद्ध महिला, पुरुष, लहान शाळकरी मुले यांना शासकीय मुलभूत घटकापासून वंचित रहावे लागत आहे. रस्ता होत नसल्याने आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागीय अधिकारी कानाडोळा करत आहेत. यामुळे येथील महिलांनी 8 मार्च या जागतिक महिला दिनी न्याय मिळावा यासाठी बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता संबंधित अधिकारी रस्ता अडवणाऱ्या वर नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बारामतीचे उपविभागीय तथा दंडाधिकारी वैभव नावडकर, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती तालुका पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, यांना देण्यात आले आहे. तसेच रस्ता अडवणाऱ्या संदर्भात सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना मार्ग काढावा या सूचना वारंवार केल्या आहेत मात्र अधिकाऱ्याकडून ठोस कारवाई केली जात नाही यामुळेच मी व अनेक महिला 8 मार्च या जागतीक महिला दिनी न्याय मिळावा म्हणून बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहोत. त्यादिवशी रस्त्याबाबतचा मार्ग न निघल्यास याच ठिकाणी आमरण उपोषण सुरू करणार आहे याची संबंधित अधिकारी यांनी नोंद घ्यावी असे उपोषणकर्त्या वनिता बोरकर यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.