झारगडवाडी सोसायटीच्या चेअरमन पदी बाळासाहेब कोळेकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी सुरेश करे यांची बिनविरोध निवड..
बारामती : झारगडवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटी ही १९११ साली स्थापन झाली असून, वडीलधाऱ्यानी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेची निवडणूक लागू नये म्हणून गावातील पदाधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले होते. आणि आता चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक देखील बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले आहे. चेअरमन पदासाठी तीन जण इच्छुक होते. यामध्ये बाळासाहेब कोळेकर, नवनाथ बोरकर व महिला संचालक रंजना बोरकर हे इच्छुक होते. मात्र संचालक मंडळाने तीन इच्छुकांची मत जाणून घेत साधक बाधक चर्चा करून निवडणुक न लावता एकमताने यावेळी मल्हारी कोळेकर यांना चेअरमन पदाची संधी देऊ असे सांगितले त्यावर मल्हारी कोळेकर यांच्या नावाला दुजोरा देत रंजना बोरकर आणि नवनाथ बोरकर यांनी चेअरमन पदासाठी कोळेकर यांना पाठिंबा दिला. तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुरेश करे यांचे एकमेव नाव आल्याने त्यांना संधी देण्यात आली..
बारामती प्रशासकीय भवनात असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयात चेअरमनपदासाठी बाळासाहेब कोळेकर यांचा तर व्हॉइस चेअरमनपदासाठी सुरेश करे यांचा एकमेव अर्ज आल्याने या दोघांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद दुरगुडे व सहाय्यक अधिकारी अमर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मावळते चेअरमन, हौसराव मासाळ, माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र सोनवणे, माजी चेअरमन राजेंद्र बोरकर, संचालक नारायण कोळेकर, झारगडवाडी सोसायटीचे संचालक नवनाथ बोरकर, परशुराम बोरकर, अंकुश निकम, दशरथ झारगड, सतीश कुलाळ, भिवाजी बनकर महिला संचालक रंजना बोरकर, सविता शेडगे, सचिव अंकुश बोरकर सभासद भाऊसाहेब झारगड, धुळदेव बोरकर, आदी मान्यवर उपस्थित होते..
बाळासाहेब कोळेकर ( चेअरमन ) - देश स्वतंत्र होण्यापूर्वी वडीलधाऱ्यांनी रोपटे लावून स्थापन केलेली झारगडवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटीचा आज वटवृक्ष झाला आहे. या संस्थेची स्थापना 1911 साली झाली आहे या संस्थेची स्वतःची लाखो रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. भविष्यात सर्व संचालक मंडळ आणि सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेसाठी काम करणार आहे त्याचबरोबर सोसायटीमध्ये कर्जरूपी असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी संचालक मंडळाच्या आणि सहाय्यक निबंधक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहे. वेळ पडली तर जुन्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई देखील केली जाईल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा