मुख्य सामग्रीवर वगळा

झारगडवाडी ग्रामपंचायतचे तत्कालीन उपसरपंच,विद्यमान सदस्या यांना पुणे जिल्हाधिकारी यांनी ठरवले अपात्र

झारगडवाडी ग्रामपंचायतच्या तत्कालीन उपसरपंच, विद्यमान सदस्या यांना पुणे जिल्हाधिकारी यांनी ठरवले अपात्र..


जात वैधता प्रमाणपत्राची दिरंगाई करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्र... 

निवडणुकीनंतर दोन वर्षे आठ महिने होऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पुणे जिल्हाधिकारी अपात्रतेचा दिला आदेश....

बारामती : शासनाने सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात निर्देशित केलेल्या जात वैधता प्रमाणपत्र नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झारगडवाडी ता. बारामती येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सोनाली रामभाऊ करे यांना पुणे जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवत त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे यामुळे निवडणूकीनंतर कागदपत्राची दिरंगाई करणाऱ्यांना चांगली चपराक मिळाली आहे.

कोविड-१९ जागतिक महामारीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या होत्या. परंतु महामारीच्या काळात प्रशासनातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करत या निवडणुका २०२० च्या अखेरीस पार पडल्या. जानेवारी २०२१ पासून राज्यात कार्यरत असलेल्या जवळपास १४,००० ग्रामपंचायत कार्यकारणीतील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक उमेदवारांना कोविड पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे १२ महिन्यांच्या विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे पडताळणी समितीकडून दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यास सादर करण्याची अंतिम मुदतवाढ १० जुलै २०२४ पर्यंत देण्यात आली होती.

ग्रामपंचायत झारगडवाडी मधील एकूण १५ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सहा सदस्य आरक्षित जागेवरील उमेदवार असून त्यापैकी पाच सदस्यांनी मा. तहसीलदार बारामती यांच्याकडे आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढवून सोनाली रामभाऊ करे या विजयी झाल्या होत्या. नामनिर्देशन अर्जाबाबत जात पडताळणी करण्यासाठी केलेल्या आर्जची पावती जोडून दिलेली होती. परंतु सदर अर्ज पडताळणी समितीकडून नाकारण्यात आलेला होता. दोन वर्षे आठ महिने होऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर केल्याने ज्ञानगंगा सेवाभावी संस्था संस्थापक/अध्यक्ष युवराज पोटे यांनी त्यांचे विरोधात मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. सदर प्रकरणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देत सोनाली रामभाऊ करे याना ग्रामपंचायत सदस्य पदी राहण्यासाठी अपात्र ठरवून २६/०८/२०२४. निर्णय देऊन मोहोर लावली.

कोट : निवडणूक काळामध्ये फॉर्म भरण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जात पडताळणी करण्यासाठी अर्ज भरले जातात. पावती सादर करून निवडणुकीमध्ये आरक्षित जागेवरती भाग घेतला जातो निवडणूक झाल्यानंतर आरक्षित जागेवर निवडून आलेल्या उमेदवार यांचेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते ही अतिशय गंभीर व असंविधानिक बाब आहे. प्रशासनाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपल्यावर स्वतः अहवाल मागवून अश्या उमेदवारांवर कार्यवाही केली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी व्यक्त केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.