ज्ञानगंगा जनजागृती फाउंडेशनच्या वतीने डोर्लेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वाटप
ज्ञानगंगा सेवाभावी फाउंडेशन संस्था संचलित ज्ञानगंगा जनजागृती फाउंडेशनचे महाराष्ट्रभर समाजसेवेचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद... तहसीलदार गणेश शिंदे
डोर्लेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..
ज्ञानगंगा सेवाभावी फाउंडेशन संस्था संचलित ज्ञानगंगा जनजागृती फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..
बारामती : डोर्लेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सेवाभावी सामाजिक काम करणारी ज्ञानगंगा जनजागृती फाउंडेश महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे शालेय साहित्यांचे १५० विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यामध्ये १५ डझन वह्या, १५० पेन ,१५० पेन्सिल ,१०० उजळणी, चित्रकला वही बारा शालेय साहित्याचे वाटप व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, व बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्या हस्ते करण्यात आले..
आनंददायी कार्यक्रमासाठी ज्ञानगंगा जनजागृती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक/अध्यक्ष युवराज पोटे, कार्याध्यक्ष बारामती तालुका अमोल यादव ,महिला अध्यक्ष बारामती तालुका ॲड. माया पाळेकर, महिला उपाध्यक्ष बारामती तालुका सौ. रूपालीताई लोणकर, सचिव बारामती तालुका योगेश नाळे, तसेच सोशल मीडिया प्रमुख शेखर खरात, डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सुप्रिया नाळे, राणी घनवट आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालगुडे यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश कुंभार यांनी केले व आभार प्रदर्शन गायकवाड यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व महिला शिक्षकांचे योगदान लाभले.
ज्ञानगंगा सेवाभावी संस्था संचलित ज्ञानगंगा जनजागृती फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्या वाचून शिक्षण थांबू नये. यासाठी ज्ञानगंगा सेवाभावी संस्था शैक्षणिक साहित्य वाटप करीत असते इथून पुढेही असेच कार्य करीत राहील असे संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. रुपालीताई लोणकर यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा