निरावागज ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अँड. हेमंत विठ्ठलराव देवकाते यांची बिनविरोध निवड..
![]() |
| नवनाथ बोरकर |
![]() |
| अँड. हेमंत विठ्ठलराव देवकाते ( उपसरपंच ) |
बारामती : बारामती तालुक्यातील निरवागज हे गांव राजकीय दृष्ट्या महत्वाचे गांव आहे. या गावाच्या अवतीभवती बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण सतत फिरत असते. या राजकीय गावाची ओळख असलेल्या निरावागज ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अँड. हेमंत विठ्ठलराव देवकाते यांची बिनविरोध निवड झाली आहे. मागील पाच वर्षामध्ये पाठीमागील पंचवार्षिक मध्ये त्यांच्या पत्नी निरावागज ग्रामपंचायत च्या सरपंच पदी कार्यरत होत्या, त्यांच्या सौभाग्यवती सौ. पूनम हेमंत देवकाते यांनी निरावागज चे सरपंच म्हणून अतिशय उत्तम काम केले होते. आणि आता उपसरपंच पदी निवड झालेले नवनिर्वाचित उपसरपंच स्वताः एक उत्तम वकील असून त्यांचा बारामती तालुक्यामध्ये प्रचंड दांडगा लोक संपर्क आहे यामुळे अँड. हेमंत देवकाते यांचा फायदा आता गावच्या विकासासाठी नक्कीच होणार आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाची गंगा तळागातील सर्वसामान्य लोकापर्यन्त पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार गावामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावात एकोपा ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करणार अशी भावना निवड झालेले नवनिर्वाचित उपसरपंच अँड. हेमंत विठ्ठलराव देवकाते सांगितले आहे.
उपसरपंच निवडीच्या वेळी मदन (नाना) देवकाते, विश्वास (नाना) देवकाते, गुलाब (आप्पा) देवकाते, राजाभाऊ देवकाते, अविनाश देवकाते, प्रकाश (आण्णा) देवकाते, जगदीश देवकाते, सोमनाथ भोसले, गणपत देवकाते , संजय देवकाते, वैभव देवकाते, पोपटराव देवकाते, सुनिल देवकाते आदि मान्यवर मान्यवर उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा