मुख्य सामग्रीवर वगळा

बारामतीत उद्या कुस्त्यांचं जंगी मैदान; युवा नेते जय ( दादा ) पवार यांच्या पुढाकारातून मैदानाचं आयोजन..

बारामतीत उद्या कुस्त्यांचं जंगी मैदान; युवा नेते जय ( दादा ) पवार यांच्या पुढाकारातून मैदानाचं आयोजन.. 

नवनाथ बोरकर 

बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या 65 व्या वाढदिवसा निमित्ताने बारामती तालूका कुस्तीगीर संघाच्या वतीने ऱविवार दि. २८ जुलै रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जयदादा पवार यांनी दिली. अजितदादा पवार यांनी आजवर कुस्ती आणि कुस्तीगीर यांच्यावर प्रेम केले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील महान मल्लाच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.. 
बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये दुपारी १ वाजता होणाऱ्या या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माउली कोकाटे यांची होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी माउली जमदाडे विरुद्ध महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख यांची होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध गणेश जगताप यांची होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती मुंबई महापौर केसरी भारत मदने विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी योगेश जगताप यांची होणार आहे.



या मैदानावर जवळपास शंभर मल्लाच्यात कुस्त्या होणार आहेत. या मैदानास आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, गिता फोगट, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख आदी कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मैदानास कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खासदार सुनेत्राताई पवार, आमदार सुनीलअण्णा शेळके, आमदार दत्तात्रय मामा भरणे उपस्थित राहणार आहेत. 

या कुस्ती मैदानावर नॅशनल खेळाडू सोनाली मंडलिक विरुद्ध अमृता पुजारी यांच्यात लढत होणार आहे.या कुस्ती मैदानास महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल उपस्थित राहणार आहेत तरी कुस्तीशौकीनानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस शिवाजीराव काळे, जंगल वाघ, दिलीप काटे, संतोष टाटीया, सुधाकर माने, पोपटराव गावडे, उत्कर्ष काळे, महेश देवकाते, धैर्यशील काळे, ऋषी गावडे, अमोल पवार, निलेश जगदाळे, गितेश पलंगे, ओम टाटीया आदी बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.