मुख्य सामग्रीवर वगळा

वीर धरणातून नीरा नदीमध्ये केव्हाही पाणी सोडले जाणार...

वीर धरणातून नीरा नदीमध्ये केव्हाही पाणी सोडले जाणार... कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव.

संग्रहीत फोटो...
बारामती : नीरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे. वीर धरणाची पाणी पातळी आज 24 रोजी सायंकाळी 5 वाजता 577.69 मीटर व उपयुक्त पाणीसाठा 7.132 टीएमसी इतका असून धरण 75.80 टक्के भरले आहे. नीरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणे भरली की धरणातील विसर्ग किंवा या धरणाच्या पुढे पडलेल्या पावसाचे पाणी वीर धरणात येते. या धरणावरून पाण्याचे संतुलन सांभाळले जाते. त्या दृष्टीने वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणा मधून येत्या 48 तासात नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडण्यात येईल असा तातडीचा संदेश निरा उजवा कालवा फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सहाय्यक अभियंता श्रेणी एक उपविभागी अभियंता व वीर, फलटण, माळशिरस, माचणूर व पंढरपूर या सर्व शाखांच्या शाखाधिकार्‍या यांना दिला आहे. नीरा नदीकाठच्या लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन प्रत्येकाने आपल्या स्तरावर घेण्यात यावे असे कालवा तार क्रमांक 135 ने सुचित करण्यात येऊन त्याबाबत सातारा, सोलापूरचे जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ, अधीक्षक अभियंता व प्रशासक सोलापूर, वाई, फलटण, माळशिरस, पंढरपूरचे सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांना तातडीने माहितीस्तव कळविण्यात आल्याची कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सांगितले.

आज सायंकाळी पाच वाजता पाणीसाठा पुढील प्रमाणे...

भाटघर 62.99 टक्के, नीरा देवघर 55.34, वीर 75.80, गुंजवणी 67.63 टक्के या चार धरणांमध्ये 1.463 टीएमसी पाण्याची आवक चालू आहे. सर्व धरणातील एकूण पाणीसाठा 63.98 टक्के झाला आहे. गतवर्षी याच दिवशी तो 52.26 टक्के होता. गुंजवणी धरणातून सायंकाळी सहा वाजता 1710 की क्युसेक्सचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वीर धरणातून निरा आणि उजवा कालव्याला खरीप पिकासाठी यापूर्वीच पाणी सोडण्यात आले आहे.

गणेश शिंदे ( बारामती तहसीलदार ) : बारामती तालुक्यातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने 48 तासाच्या आत मध्ये केव्हाही नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येईल अशी परिस्थिती आहे यामुळे नदीकाठच्या गावांनी आणि नागरिकांनी स्वतःची तसेच आपल्या जनावरांची काळजी घ्यावी तसेच मच्छीमारांनी मासेमारी करण्यासाठी पाण्यामध्ये उतरू नये असे आव्हान बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.