महाराष्ट्र सरकारकडून आता गणेश उत्सवानिमित्त मिळणार "आनंदाचा शिधा"...
महाराष्ट्र राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी ‘आनंदाचा शिधा’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकाधारक कुटुंबांना विशेष शिधा वाटप केले जाणार आहे.हा शिधा 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत वितरित केला जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील गोरगरीब जनतेला गणेशोत्सव आनंदाने साजरा करता येणार आहे.
‘आनंदाचा शिधा’ योजनेची वैशिष्ट्ये..
‘आनंदाचा शिधा’ योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारक कुटुंबाला पाच वस्तूंचा संच दिला जाणार आहे. या संचात प्रत्येकी 1 किलो रवा, चणाडाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल असे एकूण चार पदार्थ असतील. या संचाची किंमत 100 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत बाजारभावापेक्षा खूपच कमी आहे, त्यामुळे गरीब कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे.
शिधापत्रिकेचे मुख्यत: तीन प्रकार आहेत:
एपीएल (APL) शिधापत्रिका: दारिद्र्यरेषेवरील नागरिकांसाठी. यांना दरमहा 15 किलो रेशन मिळते.
बीपीएल (BPL) शिधापत्रिका: दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी. यांना दरमहा 25 किलो रेशन मिळते.
अंत्योदय शिधापत्रिका: अत्यंत गरीब नागरिकांसाठी. यांना दरमहा 35 किलो रेशन मिळते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा