मुख्य सामग्रीवर वगळा

डोर्लेवाडीत सुप्रिया मनोज नाळे सरपंचपदी मोठ्या मताधिक्याने विजयी..

डोर्लेवाडीत सुप्रिया मनोज नाळे सरपंचपदी मोठ्या मताधिक्याने विजयी..


डोर्लेवाडीत जय हनुमान पॅनलला घवघवीत यश..
डोर्लेवाडीत आता महिला सरपंचाच्या हाती गावचा कारभार..

डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी जय हनुमान पॅनलच्या सुप्रिया मनोज नाळे यांनी मोठे मताधिक्य घेत विजय संपादन केला आहे. यामध्ये जय हनुमान पॅनलने १५ पैकी ८ जागा जिंकत डोर्लेवाडी ग्रामपंचायतवर सत्ता कायम ठेवली आहे. विरोधी असलेल्या जय भवानी माता पॅनलला सात जागेवर विजय मिळवता आला. 
डोर्लेवाडी ( बारामती ) ग्रामपंचायतचा कारभार आता महिलेच्या हाती आला आहे. या ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण पडलेले होते यामध्ये जय हनुमान पॅनलच्या सरपंच पदासाठी सुप्रिया मनोज नाळे, जय भवानी माता पॅनलच्या ज्योती अतुल भोपळे,अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलच्या रोहिणी हरिभाऊ आटोळे, आणि अपक्ष प्रभावती कांतीलाल नाळे यांनी सरपंच पदासाठी निवडणूक लढवलेली होती यामध्ये सुप्रिया मनोज नाळे यांनी बाजी मारली आहे त्यांनी सर्वाधिक प्रथम क्रमांकाची १९१४ मते मिळवत विजयी संपादन केला. दुसऱ्या स्थानी ज्योती अतुल भोपळे यांना १५३१ मते मिळाली तर तिसऱ्या स्थानी रोहिणी हरिभाऊ आटोळे यांना १००६ मते मिळाली आणि चौथ्या स्थानी प्रभावती कांतीलाल नाळे यांना अवघी १६७ मते मिळाली.. सुप्रिया मनोज नाळे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना सरपंच पदी निवडून आल्याचे घोषित केले. डोर्लेवाडीत हनुमान पॅनलच्या वतीने सरपंच आणि विजय सदस्यांचे ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतश बाजीत गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पॅनल प्रमुख बापूराव गवळी, रंजीत मोरे, भगवान शिरसागर, ज्ञानदेव नाळे, अशोक घोरपडे, विठ्ठल नाळे, अंकुश खोत, प्रल्हाद भोपळे, वकील पंढरीनाथ नाळे, रामभाऊ कालगावकर, एपी काळकुटे, महादेव नेवसे तर कार्यकर्ते गजानन नाळे, मनोज नाळे, मनोज काळोखे, संदीप मोरे, आदिनाथ काळेबेरे, गणेश नाळे, कल्याण मेहत्रे, मंगेश लोणकर, मोहन नेवसे, संजय नाळे, संदीप नाळे, विजय भोपळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डोर्लेवाडी मध्ये जरवेळेस जय हनुमान पॅनल आणि जय भवानी माता पॅनल मध्ये सरळ लढत पहायला मिळायची. मात्र या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलने अल्पसंख्यांक मतदाराची मोट बांधत सरपंच पदासह काही वार्ड मध्ये सदस्य उभे केल्याने या ठिकाणी दोन्ही पॅनल समोर मोठे आव्हान उभे राहिले होते यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलला प्रचार यंत्रणा राबवताना दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ८२ टक्के मतदान झाल्यामुळे नेमकं कोण विजय होणार याची धाकधूक सर्वांनाच लागून राहिली होती. यात जय भवानी माता पॅनलचे तीन तर हनुमान पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते उर्वरित दहा जागेसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर सरपंच पदासाठी चार उमेदवार रिंगणात होते यामध्ये जय हनुमान पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सुप्रिया मनोज नाळे यांना १९१४ मध्ये मिळाली तर विरोधी जय भवानी माता पॅनलच्या उमेदवार ज्योती अतुल भोपळे यांना १५३१ मते मिळाली तर स्वाभिमानी अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलच्या उमेदवार रोहिणी हरिभाऊ आटोळे यांना १००६ मते मिळाली तर अपक्ष प्रभावती कांतीलाल नाळे यांना फक्त १६७ मते मिळाली..
सत्ताधारी जय हनुमान पॅनलचे विजयी उमेदवार - छबुबाई हनुमंत मदने, विश्वजीत भारत घोडे, राणी निरंजन नेवसे, रेखा माणिक नाळे, विद्या सचिन काळकुटे, राहुल सुरेश भोपळे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- सुमित्रा अजित वामन, सुनिल मारुती म्हेत्रे..
विरोधी जय भवानीमाता पॅनलचे विजयी उमेदवार- सचिन चंद्रकांत निलाखे, सोनाली दिलीप नवले, प्रशांत बळीराम जाधव, संदीप पांडुरंग कुदळे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- बीबी शामराव शिंदे, सोनाली अमोल शिंदे, राजेंद्र दुर्गा शिंदे
चौकट - आदर्श सरपंचाचा दारून पराभव...
डोर्लेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत जय हनुमान पॅनलचे पांडुरंग सलवदे हे तब्बल ८७० मतांच्या फरकाने थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आले होते.पाच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेसह विविध ५ खासगी संस्थांचे आदर्श सरपंच पुरस्कार मिळाले होते.यावर्षी इतर नव्या उमेदवारांना संधी देता यावी म्हणून पॅनलने मागणी असतानाही त्यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र तरीही सलवदे हे सदस्य पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते.शेवटी ज्या जनतेनी निवडून दिले त्याच जनतेनी यावेळी मात्र त्यांचा दारुण पराभव केला. सलवदे यांना केवळ १६८ मतांवर समाधान मानावे लागले.
 
चौकट - स्वाभिमानी अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलची कडवी झुंज..
डोर्लेवाडी येथील निवडणुकीतील सरपंचपदाच्या उमेदवार रोहिणी हरिभाऊ आटोळे यांनी मागील ३ वर्ष गावात मोठ्या प्रमाणात सामजिक कार्यात सहभाग घेऊन विविध उपक्रम राबविले होते.अनेक शाळा व संस्थांना सामजिक भावनेतून मदत केली होती. त्यांनी गावातील कोणाचेही राजकीय पाठबळ नसताना स्वाभिमानी अल्पसंख्यांक संघटनेच्या जनसेवा पॅनलच्या माध्यमातून या पारंपारिक दोन्ही पॅनलपुढे फार मोठे आव्हान उभे केले होते. दोन्ही पॅनलनी या उमेदवाराचा धसका घेतला होता. त्यानुसार फार मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण झाले काही ठिकाणी मतदारांना दमबाजी देखील करण्यात आली. मात्र तरीही या उमेदवाराने तब्बल १००६ मते मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.