मुख्य सामग्रीवर वगळा

झारगडवाडी ग्रामपंचायत मधील दफ्तर तपासणी कधी होणार पूर्ण..

झारगडवाडी ग्रामपंचायत मधील दफ्तर तपासणी कधी होणार पूर्ण..


तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची वाढलीय धाकधूक...दप्तर चौकशीत नेमक काय होणार उघड? याकडे ग्रामस्थांचे लागले लक्ष.. 

झारगडवाडी ग्रामपंचायत ची ७ सप्टेंबर रोजी सुरू झालीय दप्तर तपासणी..

झारगडवाडी : बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार, अपहार, अनियमितता झाल्याच्या आरोपाबद्दल सखोल चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी पुणे जिल्हा परिषद पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झारगडवाडी ग्रामपंचायत मधील १४/१५ वा वित्त आयोग, नागरी सुविधा निधी, जिल्हा निधी, ग्रामनिधी बाबत दफ्तर ची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे यानुसार ७ सप्टेंबर पासून या ग्रामपंचायत मध्ये चौकशी सुरू झाली आहे. यासाठी वेल्हे येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके, व पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विद्याधर ताकवणे यांची नियुक्ती दप्तर चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 

झारगडवाडी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या त्याच अनुषगाने ग्रामपंचायत कामकाज बाबत अनियमितता यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याच्या तीव्र शंका निर्माण झाल्या होत्या. यामुळेच सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे आणि त्यांचे इतर सहकारी यांनी मिळून पुणे जिल्हा परिषद पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झारगडवाडी ग्रामपंचायत मधील १४/१५ वा वित्त आयोग, नागरी सुविधा निधी, जिल्हा निधी, ग्रामनिधी बाबत दफ्तर ची सखोल चौकशी करण्याची मागणी दिनांक २८/०८/२०२३ ची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे आतापर्यंत तीन वेळा या अधिकाऱ्यांच्या मार्फत झारगडवाडी ग्रामपंचायत मध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे झाली आहेत यामुळे दप्तरी चौकशी दरम्यान अवधी लागत आहे. या चौकशीत तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची मात्र धाकधूक वाढली आहे. यामुळे तपासणीमधून नेमक काय उघड होणार? याकडे संपूर्ण गावाबरोबरच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.