मुख्य सामग्रीवर वगळा

झारगडवाडीत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात होतोय साजरा..

झारगडवाडीत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात.. 

नऊ दिवस भाविकांना भरदास्त मनोरंजनाचे कार्यक्रम..


झारगडवाडीत शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.. या ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने भरदास्त कार्यक्रमाचे आयोजन नऊ दिवस होत असते.. पहिल्या माळेपासून नवव्या माळेपर्यंत भाविकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम असतात यामध्ये पोतराजाचा मेळा, स्वर चंदन गाण्याचा कार्यक्रम, रेखा गेजगे यांचा गायन पार्टीचा कार्यक्रम, स्थानिकांसाठी डान्स स्पर्धा, जय भवानी आराधी वाळकी देलवडी मंडळाचा कार्यक्रम, खास महिलांसाठी होम मिनिस्टर, होम यज्ञ आणि स्थानिक आराधी मंडळ यांचा गाण्याचा कार्यक्रम, शेवटच्या दिवशी गट विसर्जनाचा कार्यक्रम आणि विजयादशमीच्या दिवशी देवीचा छबिना म्हणजेच काठीची भव्य मिरवणूक गावातून काढली जाते असे नऊ दिवस झारगडवाडी येथील भवानी माता मंदिरामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांच्यावतीने कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने या मंदिराला मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याने मंदिर प्रकाशाने उजळून निघाल आहे..

झारगडवाडी ( बारामती ) येथील भवानी मातेचा मंदिर जवळपास 100 वर्षापासून असल्याचे बोलले जात आहे.. त्यावेळी भवानी मातेचा उगम झाल्याचं वडीलधाऱ्या माणसाकडून सांगितलं जातय.. तरवाडाच्या बुडामध्ये भवानी मातेची मूर्ती दिसून आली पूर्वीच्या माणसाने त्या ठिकाणी मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करून छोटसं मंदिर उभारलं यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर हळूहळू त्याच जागेवरती गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून आता भव्य मंदिर उभारण्यात आल आहे.. ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून झारगडवाडी व पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे यामुळे या ठिकाणी नवरात्र उत्सवातच नव्हे तर इतर दिवशी देखील भावीक या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात अशी या मंदिराचे आख्यायिका सांगितले जात आहे.. झारगडवाडी ग्रामपंचायत आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांच्यावतीने मंदिरासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात दानशूर व्यक्तीनी सुशोभीकरण करून दिले आहे.. यामुळे या ठिकाणी भवानी माता मंदिर प्रशस्त दिसून येत आहे.. 

नवरात्री उत्सवानिमित्त गावातील भवानी माता मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावरील झाडे जुडपे ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आली तसेच रस्त्यावरती मुरूम टाकण्यात आला. त्यामुळे भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बोरकर, झारगडवाडी गावचे सरपंच अजित बोरकर, सदस्य अजित बुरुंगले, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख बोरकर, संतोष मासाळ, रामभाऊ करे यांनी पुढाकार घेतला.. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.