मुख्य सामग्रीवर वगळा

झारगडवाडीत सरपंचाने 15 ऑगस्ट दिवशी ध्वजारोहण करण्याचा मान दिला वीर पत्नी आणि माजी सैनिकांना

झारगडवाडीत सरपंचाने 15 ऑगस्ट दिवशी ध्वजारोहण करण्याचा मान दिला वीर पत्नी आणि माजी सैनिकांना..



बारामती : देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.. बारामती तालुक्यातील झारगडवाडी चे युवा सरपंच अजित दिलीप बोरकर यांनी ७६ व्या स्वातंत्र्य दिना दिवशी ग्रामपंचायत समोर स्वतः तिरंगा ध्वज न फडकवता देश सेवा केलेल्या वीर पत्नी आणि माजी सैनिकांना ध्वजारोहण करण्याचा मान देऊन सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे यामुळे या सरपंचाचे सर्वत्र कौतुक होत आहे..


यावेळी सरपंच यांनी आलेल्या माजी सैनिक रहीम सय्यद, विलास घनवट, अशोक शेडगे, शंकर करे, आणि वीर पत्नी सुनंदा नाळे यांना ग्रामपंचायतच्या वतीने शाल श्रीपळ देऊन त्यांचा सत्कार देखील केला..

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बोरकर, सरपंच अजित बोरकर, उपसरपंच सोनाली करे, माजी सरपंच वैशाली मासाळ, माजी सरपंच नितीन शेडगे, माजी  उपसरपंच वैष्णव बळी, ग्रामपंचायत सदस्या कल्पना झारगड, मालन टिंगरे, पूनम आवटे, सोनाली चव्हाण, पोलीस पाटील शोभा बोरकर, ग्रामस्थ शिवाजी बोरकर, प्रवीण बोरकर, संतोष मासाळ, सतिश बिचकूले, अविनाश जाधव, रामभाऊ करे, हनुमंत झारगड, राहूल बिचकूले, गणेश बोरकर, पप्पू  कचरे, ग्रामपंचायत क्लार्क अनिल माने, शिपाई आदित्य आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट -  कमी कालावधी मिळालेल्या सरपंचांना गावात कामे करून आपला ठसा उमटवायचा असतो यामुळे पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याकडून मान पानाची आलेली कुठलीच संधी डावलली जात नाही, मात्र युवा सरपंच अजित बोरकर याला अपवाद आहेत त्यांनी त्यांच्या काळात 15 ऑगस्ट या ७६ व्या स्वतंत्रदिना दिवशी स्वतः ध्वज न फडकवता देश सेवा केलेल्या माजी सैनिक आणि वीर पत्नी यांना ध्वजारोहण करण्याची संधी देत त्यांना मान दिला आहे आणि त्यांचा सन्मान देखील केला आहे यामुळे या झारगडवाडी युवा सरपंचाचे सर्वत्र तोंड भरून कौतुक होत आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बारामतीत इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

इंस्टाग्राम वर रिल्स बनवत "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे".. "सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती पोस्ट.. पोस्ट करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आवळ्या मुसक्या.. आता जेल मधून आरोपी म्हणत असेल पोलीस No comprmise.. बारामती तालुक्यातील एकाने दहशत माजवण्याच्या हेतूने *Chiku.dada_official* या इन्स्टा आय डी वरती "आम्ही ठोकत नाही ओ, "मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे" असा ऑडीओ असलेला व्हिडोओ टाकुन त्यावरती " सरकार No comprmise" असे कॅप्शन टाकुन इन्स्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट करुन समाजात दहशत माजविन्याचे कृत्य आरोपीने केल्याने त्याच्या विरुद्ध BNS कलम 353 (2) नुसार बारामती तालुका पोलीसात गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.. श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्...

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले  ताब्यात.. बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.. बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे. शनिवार ( ता. 11 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न के...

इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

पतीच्या निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे  इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.  समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.  अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.